Funny Viral Photo: सोशल मीडियावर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही विषय मजेशीर; तर काही गंभीर असतात. सोशल मीडियावर रस्त्यावर लावलेल्या पाट्या, घर किंवा कार्यालयाबाहेर लावलेले सूचना फलक, वाहनांच्या मागे लिहिलेली घोषवाक्ये चांगलीच व्हायरल होत असतात. काही पाट्या मजेशीर असतात; तर काही पाट्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या अशीच एक पाटी समोर आली आहे, जी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर बघता तेव्हा तिथे असंख्य पोस्ट तुमची वाट पाहत असतात. दररोज लोक सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतात आणि जेव्हा आपण सोशल मीडियावर जातो तेव्हा त्या सर्व पोस्ट आपल्या टाइमलाइनवर दिसू लागतात. या सगळ्यामध्ये काही मजेदार व्हिडीओ आणि फोटोदेखील दिसतात, जे व्हायरल होत आहेत. तुम्हीही खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो पाहिले असतील. आताही एक रस्त्याच्या कडेला लावलेल्या बोर्डाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात नेमकं असं काय लिहिलं आहे की, लोकांना हसू आवरेना चला तर जाणून घेऊ…

व्हायरल फोटोमध्ये काय दिसते?

सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला एक बोर्ड लावलेला दिसतोय. त्या बोर्डवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये फक्त एकच शब्द आहे आणि तो म्हणजे ‘अंग्रेजी’ ENGLISH. हो, हे दोन शब्द लिहिलेले आहेत आणि त्यावर बाणाचे चिन्ह आहे. बाणाचे चिन्ह दुकान कुठे आहे हे सांगण्यासाठी आहे. आता सहसा असे बोर्ड फक्त कंत्राटांसाठी लावले जातात आणि ज्याने ते लावले, तो फारशी मेहनत घेण्याच्या फंदात पडला नाही. त्याला वाटले असेल की, शहाण्या व्यक्तींसाठी एक इशारा पुरेसा आहे आणि पाहणाऱ्या लोकांना तो समजेल.

येथे पाहा फोटो

तुम्ही नुकताच पाहिलेला फोटो @menirbhay93 नावाच्या अकाउंटवरून X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बुद्धिमान व्यक्तींसाठी एक इशारा पुरेसा आहे”, दुकानदाराने हेच म्हटले आहे. व्हायरल फोटो पाहिल्यानंतर लोकांनी मजेदार पद्धतीने कमेंट्सही केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “हे कोणत्या प्रकारचे दुकान आहे?” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “१०० मीटर अंतरावर (हिंदी) देशीचा बोर्डदेखील आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “बुद्धिमान व्यक्तीसाठी हे पुरेसे आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हा इंग्रजी कोचिंग क्लास असावा.” अशा प्रकारच्या भन्नाट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.