Puneri ati viral: आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत. उधार मागणाऱ्या ग्राहकांच्या जाचाला कंटाळून ही पाटी लावली आहे. या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

दुकानात अशी पाटी लागली आहे. याद्वारे दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. त्याने वैतागून उधारी बंद केली होती. परंतू त्याचे ग्राहक सारखे त्याच्यामागे उधारी मागत होते. यामुळे हा दुकानदार आणखी त्रस्त झाला होता. प्रत्येकाला नाही नाही सांगून वैतागल्याने शेवटी अशी पाटी लावली आहे.

पाटीवर नक्की काय लिहलंय ?

आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावरील एका विक्रेत्याने उधारी बंद करण्यासाठी अजब मार्ग शोधला आहे. एका रस्त्यावरील विक्रेत्याने त्याच्या स्टॉलवर लावलेला बोर्ड सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, यावर “उधारी एक जादू, आम्ही देणार आणि तुम्ही गायब होणार” असा बोर्ड या विक्रेत्यानं लिहला आहे. ही पाटी शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> “तनिष्का प्लिज…” बॉसने तरुणीच्या वाढदिवसाला केकवर लिहला भन्नाट मेसेज; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “बॉस हा बॉसच असतो”

लोकांच्या प्रतिक्रिया पहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@aapalviralpune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.