funny viral video: दिवाळी म्हणजे उत्सव, आनंद, फराळ आणि धमाल. पण, हा सण संपला की सुरू होतो प्रत्येक विद्यार्थ्याचा “रिअॅलिटी चेक” म्हणजे शाळा पुन्हा सुरू होणं! गोड झोप, नवे कपडे, फटाक्यांचा आवाज यानंतर जेव्हा पुन्हा वही-पेन हातात घ्यायची वेळ येते, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना थोडं अवघड वाटतं. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जिथं तिचं निष्पाप उत्तर एकून नेटिझन्स पोट धरून हसले.

हा व्हिडीओ एका लहान मुलीचा आहे, जी दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्यांदाच शाळेत जात आहे. शिक्षक नेहमीप्रमाणे तोच प्रश्न विचारतात “तू तुझा गृहपाठ केलास का?” पण, यावेळी मुलीचे उत्तर इतके गोड आणि प्रामाणिक होते की संपूर्ण वर्ग, अगदी शिक्षकही हसल्याशिवाय राहू शकले नाहीत.

व्हायरल व्हिडीओमध्ये ती लहान मुलगी निरागसपणे उत्तर देताना दिसत आहे – “मॅडम, आई मला घरकाम करायला लावत होती… मी झाडू लावला, घर पुसले आणि जेवणही शिजवले!” तिच्या चेहऱ्यावरील गांभीर्य आणि निरागसता पाहून वर्गातील सर्व विद्यार्थी हसू लागले. शिक्षिकाही हसू थांबवू शकल्या नाहीत. त्या हसत म्हणाल्या, “घरचं काम करायचं असेल तर गृहपाठ कसं करणार?” हे ऐकून सगळ्यांनाच त्या मुलीचं प्रामाणिक उत्तर खूप आवडलं.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या @ImMemesupplier अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून , या व्हिडीओने इंटरनेटवर देखील धुमाकूळ घातला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “या मुलीला तिच्या प्रामाणिकपणासाठी ऑस्कर मिळायला हवा,” तर दुसऱ्याने विनोदी पद्धतीने टिप्पणी केली, “जर आम्ही आमच्या काळात असे म्हटले असते तर मॅडमने आम्हाला मारले असते!” अनेकांनी लिहिलं की, हा छोटासा व्हिडीओ त्यांच्या बालपणीच्या आठवणी जागा करतो, जेव्हा गृहपाठपेक्षा फराळ आणि फटाक्यांची मजा महत्वाची असते.

हा व्हिडीओ फक्त एक हास्यास्पद क्षण नाही, तर तो दाखवतो की मुलांचं जग किती निरागस आणि खरं असतं. जिथं खोटी कारणे बनवता येतात, तिथं ही छोटी मुलगी प्रामाणिकपणे सत्य सांगते आणि हाच तिच्या गोडपणाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे.