Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि कधी कोणता व्हिडीओ चर्चेत येईल, काही सांगता येत नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर दिसतात. कोणी डान्स करतानाचा तर कोणी गाणी म्हणतानाचा व्हिडीओ शेअर करतात. लहान मुलांच्या व्हिडीओवर लोक आवडीने लाइक्स कमेंट्सचा वर्षाव करतात. सध्या असाच एक चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली एक संदेश सांगताना दिसत आहे. तिचा संदेश ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. (funny video child girl told benefit of speaking on the face The video goes viral)

कोणता संदेश सांगते चिमकुली?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकली कॅमेऱ्यासमोर एक भन्नाट संदेश सांगताना दिसते, “ती म्हणते, तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत नादाला लागत नाही” या चिमुकलीचा हा संदेश पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : याला म्हणतात संस्कार! हनुमान चालिसा ऐकताच बाळाने केली आईच्या गर्भात हालचाल, सोशल मीडियावरील सर्वात सुंदर VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

rrghuge_s_world या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नाद खुळा” तर एका युजरने लिहिलेय, “लय भारी” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : याला म्हणतात संस्कार! हनुमान चालिसा ऐकताच बाळाने केली आईच्या गर्भात हालचाल, सोशल मीडियावरील सर्वात सुंदर VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे ही चिमुकली?

ही चिमुकली असे भन्नाट मेसेज व्हिडीओद्वारे सांगताना दिसते. यापूर्वी सुद्धा तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिचे पालक सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ शेअर करतात. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव करतात. ही चिमुकली फक्त चार वर्षाची आहे.
काही दिवसांपूर्वी तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेणाऱ्या लोकांना उद्देशून चिमुकलीने एक भन्नाट संदेश दिला होता. ती म्हणाली होती की, “लोकांचा जास्त लोड नाही घ्यायचा. डोळे बंद करायचे अन् बोलायचं उडत गेले सगळे” चिमुकलीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.