Girl Cow Funny Video : मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक हैराण झाल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहीवेळा ही मोकाट पिसाळलेली जनावरं एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहात नाहीत, त्यामुळे रस्त्यावरून चालताना जनावर आलं तर लोक दूर पळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी गाईला पाहून पळू लागते, पण पुढे तिच्याबरोबर असं काही घडतं की तिने विचारही केला नसेल. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड झालं आहे.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक तरुणी तिच्या मैत्रिणीबरोबर रस्त्याने चालत कुठेतरी जात होती, यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक गाय चालत होती, जी त्या तरुणींच्या दिशेने येऊ लागते. हे पाहून त्यातील एक तरुणी खूप घाबरते आणि मैत्रिणीला सोडून एकटीच पळू लागते. यावेळी मैत्रिणीलाही ती पळ पळ असे सांगू लागते. पण, पळताना रस्त्यावरील चिखलात तिचा पाय घसरतो आणि ती जोरात खाली कोसळते. ती इतक्या वाईटप्रकारे कोसळते की तिची मैत्रीणही तिला सावरू शकत नाही, यामुळे तिचे पांढरे कपडे चिखलात खूप माखतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड झालं आहे.

तरुणीचा हा व्हिडीओ @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गाय म्हणत असेल की मी काहीही केले नाही.’ दरम्यान, या व्हिडीओवर युजर्सही मजेशीर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, मला गाईची भीती वाटते. दुसऱ्याने लिहिले की, तिला खूप मार लागला असेल. तिसऱ्याने लिहिले की, ती एक मुलगी आहे, ती काहीही करू शकते. शेवटी एकाने लिहिले की, गाईला एवढं कोणं घाबरतं. ही तरुणी इथलीच आहे की, परदेशातील आहे.