Jemimah funny video: महिला क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीसोबतच त्यांचा आत्मविश्वास, शैली आणि व्यक्तिमत्वही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. भारताची तरुण व लोकप्रिय खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज ही केवळ आपल्या शानदार खेळा मुळेच नव्हे, तर तिच्या खास हेअरस्टाइलमुळेही चर्चेचा विषय बनली आहे.

महिला क्रिकेट विश्वचषकात मैदानावर खेळ गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूंचा फनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते, जेमिमा रॉड्रिग्ज मॅचसाठी तयार होत असते आणि तिचे केस सेट करत असते… पण हेअरस्टाइल करणारी कोण? ती म्हणजे तिचीच टीममेट स्मृती मानधना!

व्हिडीओमध्ये जेमिमा मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणताना दिसते – “माझी हेअरस्टाइल स्मृती मानधना करते!” आणि स्मृतीही प्रोफेशनल स्टायलिस्टसारखी गंभीर चेहऱ्याने तिच्या केसांवर काम करत असते. या दरम्यान, चाहते दोघांच्याही मजेदार विनोदांवर, हास्यावर आणि चेहऱ्यावरील हावभावांवर मोठ्याने हसत आहेत.

पाहा व्हिडिओ

फॅन्सनी या व्हिडीओखाली मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे कुणी म्हणतंय “जेमिमा नेहमीच फ्रेश आणि स्टायलिश दिसते!”, तर कुणी तिच्या स्टायलिस्टचं कौतुक करतंय “तिचा हेअरस्टाइल करणाऱ्याने जबरदस्त काम केलंय!” काही चाहत्यांनी तर त्यांच्या मजेशीर नात्याबदल प्रतिक्रिया देत म्हटलं, “गोंडस जेमी धाकट्या बहिणीसारखी आहे आणि स्मृती तिची काळजी घेणाऱ्या मोठ्या बहिणीसारखी आहे,”असं म्हणत त्यांनी हास्याचं वातावरण निर्माण केलं आहे. अनेकांनी तर महिला क्रिकेटर्सच्या ग्रूमिंगला प्रोत्साहन दिलं आहे. “फॅशन आणि स्पोर्ट्स एकत्र दिसलं की आत्मविश्वास आणखी वाढतो” असं मत व्यक्त केलं आहे; तर एकाने त्यांच्या मैत्रीवर प्रतिक्रिया देत म्हटलं, स्मृती आणि जेमिमामध्ये खरोखरच अद्भुत नाते आहे.

हा व्हिडिओ केवळ मजेदारच नाही तर संघातील सौहार्द, मजा आणि सकारात्मक ऊर्जा देखील दर्शवितो. मैदानावर धमाकेदार कामगिरी करणारे हे दोघेही मैदानाबाहेरही तितक्याच उत्साही मूडमध्ये आहेत हे त्याने दाखवून दिले आहे !

तर तिच्या कामगिरीने भारताला विजय मिळवून दिलाच, पण जेमिमाच्या कारकिर्दीला एक नवी ऊर्जा दिली. तिचा आत्मविश्वास आणि जबरदस्त खेळाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ड्रेसिंग रूममध्ये तिचा मोकळा, मजेदार मूड आणि खेळाळचा तिचा आक्रमक दृष्टिकोन हे दोन्ही पैलू जेमिमाला आणखी खास बनवतात. तिचे यश कठोर परिश्रम, सांघिक भावना आणि स्मृतीसारख्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आहे. जेमिमाचा प्रवास प्रत्येक तरुण खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे.