Funny Video Viral: सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात मुलांच्या डान्सच्या, अभिनयाच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. आजकाल अनेक मुलं सोशल मीडियावर रील्स करून प्रसिद्धदेखील झाले आहेत. काही मुलं आपली कला दाखताना व्हिडीओत दिसतात तर काही मुलं अचानक काहीतरी असं बोलून जातात की, नेटकरीच त्यांना डोक्यावर चढवतात. सध्या एका लहान मुलाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक चिमुकला शाळेत जाता जाता बायको हवी असा आग्रह धरताना दिसतोय. नेमकं काय घडलंय व्हिडीओमध्ये, जाणून घेऊ या…
लहान मुलाला बायको हवी (Boy Funny Video Viral)
सोशल मीडीयावर व्हायरल झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुमचंही हसू आवरणार नाही. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक चिमुकला आपल्या वडिलांबरोबर शाळेत जायला निघाला असतो. तेवढ्यात चिमुकला आपल्या वडिलांना म्हणतो, ”शाळेत नको मला.” यावर त्याचे वडिल म्हणतात, ”मग कुठे जायचंय” तर यावर चिमुकला म्हणतो, ”बायको बघायला जायचंय.” चिमुकल्याचं उत्तर ऐकून ”बायको, लग्न करायचंय का?” असा प्रश्न वडील त्याला हसत हसत विचारतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @fd_film_production या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.१ मिलियनच्या वर व्ह्यूज आले आहेत. तसंच ”शाळेत नग बायको बघायला जायचं” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Kid Funny Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “शाळेत बायको बघण्यासाठीच जायचं असतं बाळा”, तर दुसऱ्याने “बाळाची आतापासूनच तयारी चालू आहे.” अशी कमेंट केली. तर “बायको द्या रे कोणी त्याला” अशी कमेंट एकाने केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ”काय घाई आहे तुला” घोर कलियुग आहे.