Funny video: सोशल मीडियावर रोज चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण हसावे की रडावे ते कळत नाही. सध्या एक असाच अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे जो पाहिल्यावर अनेकजण वेडे झाले म्हणायला हरकत नाही. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. हा व्हिडिओ जवळजवळ ३० कोटी लोकांनी पाहिला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये या तरुणीने ना अश्लील डान्स केलाय ना अंग प्रदर्शन केलंय तरीही एवढ्या लोकांनी हा व्हिडीओ का पाहिला हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहूनच कळेल.

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. त्यात सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक महिला असं काही करताना दिसत आहे. ज्यामुळे व्हिडिओने ३० कोटी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकतं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याशिवाय काय व्हायरल होईल आणि का होईल हे सांगता येत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला कॅमेरा ऑन ठेवून पळताना दिसत आहे.महिलेने पिवळ्या रंगाचा सूट घातला असून तिने ‘तू रूठा तो रूठ के इतनी दूर चली जाऊंगी…’ या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये महिला कॅमेरा सुरू ठेवून ही महिला मागे सरळ धावताना दिसत आहे. ही महिला नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहे हे मात्र शेवटपर्यंत स्पष्ट होत नाहीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “शेवटी पेराल तेच उगवणार” लहान मुलांच्या एका कृतीनं जिंकली लाखो लोकांची मनं; VIDEO पाहून कळेल संस्कार किती महत्त्वाचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ khushivideos1m नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत, “ऑलिम्पिक सुवर्णपदक दीदीच घेऊन येणार” असं म्हंटलंय तर आणखी एकानं “पुढच्यावेळी व्हिडीओ बनवताना सांगा मी तिचा मोबाईल घेऊन पळून जाईन आणि तिला कळणारही नाही.”