Funny Viral Video : जगभरात विविध गोष्टींबाबत निदर्शने होत आहेत. कधी न्यायासाठी तर कधी समाज परिवर्तनासाठी आंदोलन होतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही तरुणी मुलांच्या दाढीला विरोध करताना आणि रॅली काढताना दिसत आहेत. हा अनोखा व्हिडीओ भारतातील आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुणी रॅली काढताना दिसत आहेत. ही रॅली सामान्य दिसते, पण त्यांची घोषणा ऐकून आणि कार्डबोर्ड पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल. खरंतर या मुली क्लीन शेव्ह बॉयफ्रेंडसाठी रॅली काढत आहेत. मुलींच्या हातात फलकही आहेत, ज्यावर असे लिहिले आहे की वाचून तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल.

“दाढी काढा, प्रेम वाचवा” तरुणीची घोषणाबाजी

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणी प्रतीकात्मकपणे चेहऱ्यावर दाढी ठेवत ‘नो क्लीन शेव्ह नो लव्ह’, ‘दाढी काढा अथवा गर्लफ्रेंडला विसरा’, ‘दाढी काढा, प्रेम वाचवा’; ‘दाढीविरहित बॉयफ्रेंड मिळावा हीच आमची इच्छा आहे’, अशी घोषणाबाजी करत आहेत. जो कोणी या तरुणींना पाहतोय, तो ही कसली रॅली आहे म्हणून अवाक् होऊन पाहतोय. तसेच त्यांच्या हातातील घोषणांच्या पाट्या वाचून हसत देखील आहेत.

“मी अजूनही अविवाहित का आहे हे मला आता समजले.” आणखी युजर्सच्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडीओ सोशल मीडियावरील अनेक अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, परंतु तरुणींच्या ग्रुपने खरोखर रॅली काढली होती की ती फक्त रील बनवण्यासाठी होती की काही प्रमोशन शूट किंवा कार्यक्रमासाठी होती हे स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंटमधील लोणचं आवडीनं खाताय? मग ‘हा’ Video पाहाच; तुम्हालाही वाटेल किळस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘भाऊ आणि मुलींची मागणी रास्त आहे, काही मुलांचे शेव्हिंग केल्यानंतर वेगळेच रुप पाहायला मिळते.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘या आंदोलनाने माझे डोळे उघडले आहेत, मी अजूनही अविवाहित का आहे हे मला आता समजले आहे.’ आणखी एकाने लिहिले की, ‘मला समजत नाही की त्यांना दाढीचा इतका त्रास का झाला?’