Mahatma Gandhi Jayanti Wishes Messages Quotes Status : दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी ‘महात्मा गांधी’ यांची जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर आज त्यांच्या जन्मदिनी आपले जीवन गांधीजींच्या विचारांनी भरून जावो यासाठी त्यांच्या काही महत्वाच्या विचारांवर नजर टाकूयात…

कोणालाही जिंकायचं असेल, तर प्रेमानं जिंका.

मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.

Gandhi Jayanti quotes in Marathi,

चांगल्या बदलाची सुरुवात आधी स्वतःपासून करा.

Gandhi Jayanti quotes in Marathi,

अहिंसा हे दुर्बलांचे नाही, तर बलवानांचे शस्त्र आहे.

Gandhi Jayanti quotes in Marathi,

ईश्वर सत्य आहे, असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे, असे म्हणा.

तुम्ही जे काम कराल, ते महत्त्वाचं असू शकतं; पण तुम्ही काहीतरी काम करणं हे सर्वांत महत्त्वाचं असतं.

Gandhi Jayanti quotes in Marathi,

तुम्ही आज काय करत आहात, यावर तुमचे भविष्य अवलंबून असते.

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे.

माणूस जो विचार करतो, तेच तो आचरणात आणतो. त्यामुळे नेहमी चांगला विचार करावा आणि तसे वागावे.

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, मग भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.

तर गांधी जयंतीनिमित्त हे विचार तुम्ही इतरांनाही पाठवू शकता आणि स्वतःच्या आयुष्यातही त्याचा करू शकता.