चहा करण्यासाठी गॅस सिलिंडर चालू केला असता गॅसचा अचानक मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची दृश्य अत्यंत भीषण दिसत आहेत.

हेही पाहा- भररस्त्यात उडत आला भलामोठा दगड आणि बाइकस्वाराला उडवून नेलं; Video शिवाय विश्वासच बसला नसता

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील सतना येथे घडली असून रेस्टॉरंटमधील या भीषण स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे. रविवारी सकाळी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याने चहा करण्यासाठी सिलिंडर चालू केला. मात्र, सिलिंडरमधून गॅसची गळती होत असल्याचं त्याच्या लक्षात न आल्याने क्षणात गॅस शेगडीने पेट घेतला आणि त्याचं रुपांतर मोठ्या स्फोटामध्ये झालं.

हेही पाहा- नाद केला दुधवाल्यानं! Harley Davidson बाईकवर दुधाच्या किटल्या बांधतो अन् गावाकडे ठोकतो धूम, Video होतोय व्हायरल

गॅस सिलिंडरला आग लागल्याचं समजताच रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतल्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, या सिलिंडरच्या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवाय स्फोटात रेस्टॉरंटला लागलेली आग पाहण्यासाठी आजुबाजूचे लोक रस्त्यावर आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे रेस्टॉरंटला लागलेल्या आगीचा व्हिडीओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या पथकाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही नसली तरी रेस्टॉरंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय आसपासच्या दुकानांनादेखील या आगीची झळ बसली आहे. पोलिस या घटनेबाबतचा अधिकचा तपास करत आहेत.