Gautami Patil Lavani Latest Video: गौतमी पाटीलचा फॅन बेस हा भलताच मजबूत आहे. फक्त तरुणच नव्हे तर महिला, लहान मुले, वयस्कर मंडळी सगळ्यांच्या मनात गौतमीचं क्रेज आहे. असं असलं तरी अनेकदा तिच्या डान्स व्हिडीओमुळे, साड्यांमुळे तिला टार्गेट केलं जातं. गौतमीच्या नृत्यात अश्लीलता दिसत असल्याचे म्हणत अनेकांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. अगदी तिच्या नृत्यामुळे तिला ‘पाटील’ आडनाव लावू नकोस असेही इशारे वजा धमक्या यापूर्वी देण्यात आल्या होत्या. पण गौतमी ही राजकारणी, सेलिब्रिटी, व सामान्य माणसं अशा सगळ्यांनाच वेळोवेळी “मी बदलले आहे” असं सांगत राहिली. गौतमीचा हाच बदल दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेहमीप्रमाणेच गौतमी या ही व्हिडिओमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहे पण तिच्यातील बदल प्रेक्षकांच्या मनाला भावले आहेत.

महेंद्र पुणेकर ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील नृत्य प्रशिक्षण घेताना दिसत आहे. पायामध्ये घुंगरू बांधून लावणीच्या प्रशिक्षणात गौतमी रमली आहे. यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांवर गौतमीने आपल्याला लावणी शिकण्याची इच्छा आहे असे बोलून दाखवले होते. शिवाय डान्स शोविषयी बोलताना सुद्धा “मी लावणी करत नाही माझा ऑर्केस्ट्रा/ डीजे शो आहे. पण मला भविष्यात लावणीचं रीतसर शिक्षण घ्यायला आवडेल आणि मला माझ्यासारख्या अनेक लहान मुलींसाठी शिकवणी सुद्धा सुरु करायची आहे” असे म्हटले होते. ही इच्छा आता गौतमीने मनावर घेतली असल्याचे दिसतेय.

हेही पाहा- हद्दच झाली राव! जोडप्याने प्री-वेडिंग फोटोशूटसाठी दिल्या अशा पोज की, व्हिडीओ पाहून डोकंच धराल

गौतमी पाटील Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौतामीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कौतुक करत कमेंट केल्या आहेत. “पहिल्यांदा तुझा अभिमान वाटला, तुला इतकं छान नाचता येतं तर हीच कला दाखव” अशा कमेंट गौतमीच्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.