Gautami Patil Viral Video: गौतमी पाटील हे नाव कधी कौतुकाने कधी टीकेने, काहींकडून रागाने, काहींकडून प्रेमाने, कोणत्या ना कोणत्या कारणाने सदैव चर्चेत असतेच. महाराष्ट्रात सध्या गौतमीच्या डान्ससह नावाची इतकी हवा आहे की त्याला तोडच नाही. याच गौतमी पाटीलच्या कुटुंबाची कहाणी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येत गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आपण गौतमी व तिच्या आईला सोडलेलं नाही त्या मायलेकीच आपल्याला सोडून गेल्या असा दावा त्यांनी केला होता तर गौतमी आपल्याकडे परत यावी तिने आपल्याला एकदा पप्पा म्हणून हाक मारावी अशी इच्छा असल्याचे रवींद्र पाटील यांनी बोलून दाखवले होते. त्यानंतर गौतमीच्या अकाऊंटवरून गौतमीच्या आईचा एक तरुणपणीचा फोटो शेअर करण्यात आला होता. आता एका फॅन पेजवर गौतमीसह तिच्या आईचा एक गोड व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

@गौतमी पाटील कलाकार या अकाउंट वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गौतमीसह एक महिला दिसत आहे आणि गौतमीचा एक फॅन त्या दोघींसाठी खास चारोळी म्हणत आहे. त्याने “गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली” असे म्हणताच गौतमी त्या महिलेला अगदी प्रेमाने मिठी मारते. यावरूनच ही महिला म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गौतमी पाटीलची आई असल्याचे सांगण्यात आले आहे. कमेंटमध्ये सुद्धा या अकाऊंटवरून ही खरोखर गौतमीची आई आहे असे रिप्लाय देण्यात आले आहेत.

गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video

हे ही वाचा<< गौतमी पाटीलचे वडील कोण आहेत? मूळ नाव व काम काय? म्हणाले, “आज गौतमीचा आदर वाटतो पण..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडिओवर काहींनी कमेंट करत तुमचे वडीलही तितकेच धन्य आहेत. गौतमी तुम्ही बापाशिवाय छान दिसत नाही त्यांना सुद्धा तुमच्या कुटुंबात जोडून घ्या अशा पद्धतीच्या कमेंट सुद्धा या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. काहींनी गौतमीची आई खूपच साधी आहे असेही लिहिले आहे.