scorecardresearch

Premium

जेव्हा स्वप्न पूर्ण होते! आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे; माय-लेकाचा हृदयस्पर्शी VIDEO

Viral video: आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे; माय-लेकाचा हृदयस्पर्शी VIDEO

Pilots Heartwarming Surprise For Flight Attendant Mom Heartwarming Video
माय-लेकाचा हृदयस्पर्शी VIDEO

लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. कोण म्हणतं डॉक्टर व्हायचंय, कोण म्हणतं शिक्षक व्हायचंय तर कोणी म्हणतं पायलट व्हायचंय. असंच स्वप्न एका तरुणानं वयाच्या ५ व्या वर्षी पाहिलं. ५ वर्षाचा असताना या मुलानं आईला मला पायलट व्हायचंय असं सांगितलं आणि २१ वर्षानंतर हे स्वप्न त्यानं पूर्ण करुन दाखवलं. मुलानं आईला हटके सरप्राईज दिलंय, ज्या विमानानं आई प्रवास करणार असते त्याचं विमानाचा पायलट म्हणून मुलगा आईचं स्वागत करतो. यावेळी आईला इतका आनंद होतो की तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.

आपल्या मुलाला अमुक एखाद्या पदावर किंवा हु्द्यावर पाहून आई वडीलांना आनंदच होत असतो. अशाच एका आई आणि मुलाचा विमानातील भावनिक व्हिडीओ सध्या सोश मीडियावर व्हायरल होत आहे. आई वडिलांचं बोट धरून चालायला शिकलेल्या लेकरांची जेव्हा गरुड झेप घेण्याची वेळ येते तेव्हा त्या पालकांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान निराळाच असतो. असाच अभिमान या व्हिडीओमध्ये आईच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

a bride made Mehndi QR Code on the hand to get wedding gift video goes viral shared by Google
लग्नाचा आहेर घेण्यासाठी नवरीचा जुगाड! मेहंदीने हातावर कोरला QR Code, गुगलने शेअर केला व्हिडीओ
When brother Came To The Plane And Found Out His sister Was The Pilot
भाऊ बहिणीचं प्रेम! भाऊ विमानात आला आणि कळले आपली बहिणच पायलट आहे; VIDEO व्हायरल
Kiran mane with Maharashtrachi Hasyajatra actors
“ओS मानेS याSSS”, जेव्हा विमानात शिरताच किरण मानेंना ऐकू आला आवाज; म्हणाले, “दचकून बघितलं तर…”
Industrialist Anand Mahindra reacts On Man Video who converted a Boeing 737 into a private jet villa
स्वप्न पूर्ण करावं ते असं! व्यक्तीने विमानाचे केले व्हिलामध्ये रूपांतर; पण VIDEO पाहून आनंद महिंद्रांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई आणि पायलट तरुणाचा भाऊ प्रवासासाठी विमानात येत आहेत. यावेळी त्या दोघांनाही कल्पना नाही की आपला मुलगाच किंवा भाऊच या विमानाचा पायलट आहे. जसे ते आतमध्ये येतात तसं त्यांना मुलगा दिसतो आणि त्यांनतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लेकाला पाहून आईला अश्रू अनावर झाले. मुलगाही आईला आणि भावाला सरप्राईज देऊन खूप खूश झालेला दिसत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “खोया खोया चांद” मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा ड्रायव्हरचं अनोखं टॅलेंट; VIDEO पाहून सुप्रसिद्ध संगीतकाराने घेतली दखल

या दोघांचा हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. यावर नेटीझन्सनी भावनीक कमेंटस केल्या असून आईच्या प्रेमापुढे काहीच नाही, हृदय हेलावून टाकणारा क्षण, मुलाच्या कामगिरीचा अभिमान असलेली आई असे लिहीले आहे. या दोघांना पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pilots heartwarming surprise for flight attendant mom heartwarming video goes viral srk

First published on: 11-12-2023 at 12:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×