जत्रा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो आकाशपाळणा. अनेकजणांना आकाशपाळण्यात बसायला आवडते. एक तरुणीला आकाशपाळण्यात बसण्याची हौस महागात पडली आहे. स्वप्नातही कोणी विचार केला नसेल अशी गोष्ट तिच्याबरोबर घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणीचे केस चक्क आकाश पाळण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीचा जीव वाचवण्यासाठी पाळणा थांबवून तिचे केस कापावे लागले.

गणेशोत्सवादरम्यान सणासुदीच्या काळात ही घटना घडली, ज्या वेळी देशभरात अनेक जत्रा आणि उत्सव भरतात.गुजरातमधील एका जत्रेत एका तरुणीबरोबर ही घटना घडली. आकाशपाळण्यात बसण्याचा आनंद घेत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. तरुणीने केस मोकळे सोडले होते पण अचानक तिचे केस आकाशपाळण्यात एका चक्रामध्ये अडकले आणि ती वेदनेने जोरजोरात ओरडू लागली.

हेही वाचा – आग लागलेल्या इमारतीत अडकली होती २ वर्षाची चिमुकली, दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने वाचवले प्राण

जमिनीवरून उंचावर अडकलेल्या मुलीला पाहून लोकही भयभीत झाले, तिच्या किंकाळ्या जत्रेच्या मैदानातून ऐकून येत होत्या. आकाशपाळणा ताबडतोब थांबवण्यात आली आणि दोन धाडसी व्यक्ती तिला सोडवण्याच्या प्रयत्न करताना पाळण्यावर चढले. सुरुवातीला, त्यांनी तिचे केस चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा ते अयशस्वी ठरले तेव्हा त्यांनी चाकूने तिचे केस कापण्याचा प्रयत्न केला. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल आणि २३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ”ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक

घटनेच्या व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. अनेकांनी अशा आकाशपाळण्यात बसण्याचा आनंद घेताना सुरक्षा घेण्याबाबत सुचना केल्या. बर्‍याच महिलांनी असे सांगितले की, ते आता अशा आकाश पाळण्यात केस मोकळे सोडताना सावध रहा. या घटनेमुळे संपूर्ण भारतातील अम्युझमेंट पार्कमध्ये उद्यानांमध्ये कडक सुरक्षा नियमांची मागणी करण्यात आली आहे.