Goodluck Cafe Viral News: पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वसलेलं गुडलक कॅफे म्हणजे पुणेकरांची खास न्याहारीची जागा. अनेक पिढ्यांनी इथला बन मस्काचा आस्वाद घेतला आहे. पण, नुकतीच अशी एक घटना घडली की जिच्यामुळे या ऐतिहासिक हॉटेलच्या विश्वासाला धक्का बसला आहे. पुण्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गुडलक इराणी कॅफेमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे या लोकप्रिय उपाहारगृहाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रेकफास्टसाठी कॅफेत गेलेल्या एका ग्राहकाच्या बन मस्कामध्ये धक्कादायक आढळलं आणि हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. पण, नेमकं काय घडलं? जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

आकाश जळगी नावाचे ग्राहक त्यांच्या पत्नीसमवेत सकाळच्या न्याहारीसाठी गुडलक कॅफेत गेले होते. सर्वसामान्यपणे ऑर्डर दिल्याप्रमाणे त्यांना त्यांचा आवडता “बन मस्का” मिळाला. पण, पहिलाच घास घेतल्यानंतर त्यांच्या तोंडात एक अजब टोकदार वस्तू आली. सुरुवातीला वाटलं की, कदाचित बर्फाचा तुकडा असेल, पण नीट पाहिल्यावर धक्काच बसला; तो काचेचा तुकडा होता.

वेळीच लक्षात आलं, नाहीतर अपघात अटळ होता!

जळगी यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला याची माहिती दिली. हॉटेलच्या मालकाने तत्काळ क्षमा मागितली व संपूर्ण बिल माफ केलं. मात्र आकाश जळगी म्हणतात, “वेळीच लक्षात आलं म्हणून वाचलो. जर ही काच पोटात गेली असती तर मोठा अपघात झाला असता.”

तक्रार नोंदवली, पुरावा घेतला

या घटनेनंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) ऑनलाइन तक्रार नोंदवली आहे. हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार, बन मस्का ते बाहेरून मागवतात आणि या प्रकाराची माहिती त्यांनी पुरवठादारालाही दिली आहे. या प्रकरणामुळे खवय्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

पुण्याचं गुडलक कॅफे एक वारसा

१९३५ मध्ये स्थापन झालेलं गुडलक कॅफे हे पुण्याच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध उपाहारगृहांपैकी एक आहे. इथलं बन मस्का खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. पण, अलीकडील या घटनेमुळे त्यांच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशी घटना समोर आल्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा प्रकार ऐकून अनेक ग्राहक हादरले आहेत. जर एका ऐतिहासिक हॉटेलमध्येच अशा घटना घडत असतील, तर खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उभा राहतोच. या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अन्नपदार्थांमध्ये अशा धोकादायक घटकांचा समावेश असणे गंभीर आहे आणि ग्राहकांनी याबाबत सजग राहणं गरजेचं आहे.