एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगतो आहे. हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी दिसते आहे. भारत वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकावी, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ २० वर्षांनी आज दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत समोरासमोर आले आहेत. २००३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना त्यांच्यामध्ये झाला होता. ही गोष्ट लक्षात ठेवून गूगलनेदेखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. २००३ आणि २०२३ असा एक तक्ता तयार करून घेतला आहे. त्यात डाव्या बाजूला २००३; तर उजव्या बाजूला २०२३ असे लिहून सामन्यांसंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी हायलाइट (Highlight) करण्यात आल्या आहेत. त्यात पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

२००३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील काही महत्त्वाचे मुद्दे :

. भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा अंतिम सामना
. सचिन तेंडुलकरच्या सगळ्यात जास्त धावा
३. सौरव गांगुली : प्रथमच विश्वचषक संघाचे नेतृत्व
४. ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये विजयी
५. अखेर ऑस्ट्रेलियाने तिसरी विश्वचषक ट्रॉफी जिंकली.गूगलने २००३ आणि २०२३ असा तयार केलेला खास तक्ता तुम्हीसुद्धा एकदा पोस्टमधून नक्की बघा.

हेही वाचा…“इंडियाच…”, काँग्रेस नेते एकत्र बसून घेतायत भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचा आनंद, पाहा Video

पोस्ट नक्की बघा :

तर हेच सगळे मुद्दे लक्षात घेऊन गूगलने तयार केलेले २०२३ चे मुद्दे :

१. भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा अंतिम सामना
२. विराट कोहलीच्या सगळ्यात जास्त धावा.
३. रोहित शर्मा : प्रथमच विश्वचषक संघाचे नेतृत्व
४. भारत विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये विजयी
५. आणि अखेर इंडिया…

गूगलने असा खास तक्ता तयार केला आहे आणि भारतीय संघ जिंकेल, अशी इच्छा व्यक्त करीत ही पोस्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट गूगलच्या @GoogleIndia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून भारतीय संघसुद्धा त्यांची तिसरी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणार, असा विश्वास चाहते व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.