एका माणसाच्या नाश्त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यावर नेटिझन्सने मिश्र प्रतिक्रिया दिली आहे. एक ट्विटर वापरकर्त्याने असा दावा केला आहे की ज्या व्यक्तीने नाश्त्यासाठी चिल्लर पैसे दिले त्याला त्याचा सँडविच लहान तुकडे करून मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या माणसाने त्याच्या नाश्त्यासाठी 10p नाण्यांमध्ये पैसे दिले होते आणि त्याला १६ लहान तुकड्यांमध्ये त्याचा सँडविच कापलेलं दिलं. ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोला १६,००० पेक्षा जास्त लाइक्स आणि १,००० पेक्षा जास्त रीट्विट मिळाले आहेत. कॅफेने अशा लहान तुकड्यांमध्ये सँडविच कापल्याबद्दल नेटिझन्सने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली “ओएमजी हे अलौकिक आहे.”दुसऱ्या वापरकर्त्याने पुढे म्हटले, “मी त्यांना त्या प्रत्येक लहानशा तुकड्यावर सॉस लावण्यास सांगितले असते.” अजून एकाने पोस्ट केले, “मी अशा नाजूकपणे कट केलेल्या उत्कृष्ट कृतीसाठी जास्तीचेपैसे देईन.”

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Got the sandwich in small pieces as man gave the chiller while paying the bill photo viral ttg
First published on: 26-09-2021 at 14:19 IST