Grandparent Grandson Heart Touching Video : घरात आजी-आजोबा असले की घरातील वातावरण खूप वेगळं असतं. बालपणी आई-बाबा ओरडले की मायेने जवळ घेत डोक्यावरून हात फिरवणारे, लहान बनून खेळणारे हे आजी-आजोबाच असतात. त्यामुळे आजी-आजोबांना लहान मुलांचे पहिला मित्र म्हटले जाते. सतत लाड करण्यासाठी आणि सगळे हट्ट पुरवण्यासाठी आयुष्यात ते फारच स्पेशल असतात. पण, आजी-आजोबांचे प्रेम मिळण्यासाठी खूप नशीब लागते. सध्या सोशल मीडियावर आजी-आजोबा अन् चिमुकल्या नातवाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. हा व्हिडीओ खूप भावूक करणारा आहे.

आजी-आजोबांचे नातवावरील प्रेम पाहून तुम्हाला होईल आनंद

व्हिडीओतील आजी-आजोबांचे त्यांच्या नातवावरील प्रेम पाहून तुम्हालाही आनंद होईल, कारण यात एक आजी-आजोबा नातवंडाच्या वयाचे बनून त्याच्याशी खेळतायत. यावेळी नातवाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनाही आनंद होतोय.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजी-आजोबा आणि नातू गार्डनमध्ये खेळतायत. यावेळी आजोबा नातवाला सी-सॉच्या एका सीटवर बसवून दुसऱ्या सीटला पकडून ते त्याला आनंदाने खेळवतायत. यानंतर आजी-आजोबा दोघेही त्याला घसरगुंडी खेळायला सोडतात. हे खेळून झाल्यानंतर चिमुकला आजोबांना हाताला पकडून दुसऱ्या एका खेळण्याच्या दिशेने घेऊन जातो. यावेळी आजोबा नातवाला लहान मुलांच्या गोल फिरणाऱ्या पाळण्यात बसवतात आणि फिरवतात. नातू जिथे जातोय तिथे हे आजी-आजोबा त्याच्या मागून फिरतात. यावरून त्यांचे नातवावर किती प्रेम असेल याचा अंदाज लावू शकता. हे पाहताना आपल्यालादेखील तुमच्या बालपणीचे दिवस आठवतील.काही लोक हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ kokani_saggy’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आजोबा आणि नातवाचं नातं हे निराळच असतं. कारण इथे कोण लहान कोण मोठं हे गणितच नसतं. या व्हिडीओतील आजी-आजोबा नातवंडाच्या बालपणात रमून गेले आहेत. हा आजी-आजोबा आणि नातवाचा टिपलेला सुंदर व्हिडीओ खरंच ह्रदयस्पर्शी आहे.