Viral video: अलीकडे आपल्याला सोशल मीडियामुळे वारंवार वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल व्हिडिओत कपल डान्स तर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लग्नाच्या कार्यक्रमातील डान्स असतील तर कधी गावाकडील काही कार्यक्रमातील डान्स सोशल मीडियावर पोस्ट होतात. या व्हिडिओत वयस्कर लोकांचाही समावेश असतो.वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे सगळेच शॉक झाले आहेत.
अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नसोहळ्याच्या हळदीमध्ये आजीसोबत तिच्या नाती सुद्धा नाचल्या आहेत. पाच सहा तरुणींसोबत पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेल्या आजी डान्स करत आहेत.पण या आजीच्या डान्सपुढे नातीचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नववारी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.आजीचा हा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
A post shared by Swapnil Mane (@swapnilmane6534)
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ swapnilmane6534 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे.