सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी लोक असे विविध प्रकारचे व्हिडीओ करत असतात.

काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘सुसेकी’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. अशातच या महिन्याच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत पुष्पा-२ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्टोरीसह यातील गाणीदेखील सुपरहिट झाली. सध्या याच चित्रपटातील गाण्यावर आजी थिरकल्या आहेत. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय. आजींच्या डान्सचं कौतुक संपूर्ण सोशल मीडियावर सुरू आहे.

हेही वाचा… विमान सोडा, आता मुंबई लोकलमध्ये प्रवास करतेय ट्रेन सुंदरी! महिलांच्या डब्यात दिली विशेष सूचना, VIDEO एकदा पाहाच

आजीने धरला जबरदस्त ठेका

आजीच्या व्हायरल व्हिडीओने सध्या सगळ्यांचं मन जिंकलंय. अलीकडेच रिलीज झालेल्या पुष्पा-२ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ (Peelings) या गाण्यावर आजी आपल्या नातवासह थिरकताना दिसतेय. एवढ्या वयातही अगदी एनर्जेटीक डान्स तिने केला आहे. यामध्ये तिला तिच्या नातवाची साथ लाभली आहे. उत्तम डान्स स्टेप्स आणि अनोखे हावभाव करत आजीने अतिशय जबरदस्त डान्स केला आहे.

हा व्हिडीओ @akshay_partha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल दीड लाखापर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच या इन्स्टाग्राम अकाउंटवर आजींच्या डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, जे याआधीही व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा… असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी आजींच्या डान्सचं कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, माझी इच्छा आहे की आजींची १०० वर्षांनंतरही अशीच एनर्जी असेल. तर दुसऱ्याने “खूप मस्त डान्स केला आजी” अशी कमेंट केली. कर एकजण कमेंट करत म्हणाला, “अशी आजी सगळ्यांना मिळो.”