Wedding Barat Funny Viral Video : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अनेकांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. लग्न म्हटले की, बँडबाजा वरात आलीच. या वरातीत नाचण्याचा एक वेगळा आनंद असतो. त्यात घरातलच लग्न असेल, तर मग कल्लाच… याच वरातील अनेकदा गमतीदार गोष्टी पाहायला मिळतात. सध्या अशाच एका लग्नाच्या हटके वरातीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की, ही लग्नाची वरात आहे की आयपीएलची मॅच.

तुम्ही लग्नाची वरात अनेकदा पाहिली असेल, ज्यात बऱ्याचदा तुम्हीदेखील नाचायला गेला असाल. तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाची वरात ही कधी कार, कधी घोडा, तर कधी रथातून काढली जाते. या व्हिडीओतही एका मोठ्या रथातून लग्नाची वरात निघाली आहे. वर रथात बसून लग्नमंडपात दाखल होतोय. पण, यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रथात वराबरोबर दोन परदेशी महिला डान्सरदेखील नाचताना दिसतायत. वर मागे बसून नाचतोय आणि त्या परदेशी डान्सर उभ्या राहून नाचतायत. आयपीएल क्रिकेट मॅचच्या स्टेडियममध्ये ज्याप्रमाणे चिअर गर्ल्स नाचत असतात, अगदी त्याच प्रकारे या डान्सर रथात उभ्या राहून नाचतायत. अशा प्रकारे रथ हळूहळू पुढे जातोय. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही; परंतु व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेशीर व्हिडीओ एक्सवर @Superoverr नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘संपूर्ण वरातीत एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, अनेक युजर्सदेखील या व्हिडीओवर कमेंट्स करीत आहेत, एका युजरने लिहिले की, हे पाहून वधू पळून जाईल. दुसऱ्याने लिहिले की, लेव्हल पार केली भावाने. तिसऱ्याने लिहिले की, लग्नाच्या शुभेच्छा भावा!