Wedding video: लग्न म्हटलं की, आता फक्त दोन कुटुंब जोडली जाणं एवढ्यापुरती सीमित गोष्ट राहिलेली नाही; तर त्याला आठवणी, मजा आणि भावनांच्या एकत्रित सोहळ्याचे स्वरूप आल्याचे दिसते. पण, आता लग्नासंदर्भातीलच एक हादरून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका लग्नात असा प्रसंग घडला की, सगळेच हादरून गेले. नवरदेवाची पहिली बायको पोलिसांसह थेट स्टेजवर पोहोचली आणि “हा माझा नवरा आहे… माझ्याशी लग्न झालेले असताना दुसरीशी लग्न का करतोय?” असा आरोप करीत तिने मोठा गोंधळ उडवून दिला. अचानक झालेल्या या घटनेमुळे मंडपात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवरीच्या कुटुंबालाही याचा मोठा धक्का बसला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडीओत लग्न समारंभात नवरदेवाच्या पहिल्या पत्नीने अचानक केलेला प्रवेश आणि त्यानंतर झालेला गोंधळ यांचे चित्रण आहे. लग्नविधी सुरू झाल्यानंतर संपूर्ण समारंभ कसा थांबवला गेला, पोलिसांनी कसे समजावण्याचा प्रयत्न केला हे सर्व या व्हिडीओत दिसते. व्हिडीओमध्ये रात्री सुमारे ११.३० वाजता बँडबाजाचा आवाज सुरू असतानाच एक महिला पोलिसांसह लग्नस्थळी पोहोचताना दिसते. ती थेट स्टेजवर जाऊन नवरदेवाला विचारते “तुझं माझ्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न झालंय, मग दुसर लग्न का करतोयस?” नवरदेव मात्र तिला ओळखत नसल्याचे सांगत राहतो.

पाहा व्हिडिओ

त्यानंतर ती महिला जोरजोरात रडू लागते आणि मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, फोटो आणि व्हिडीओ दाखवते. पोलिस आणि वऱ्हाडी दोघेही तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व पाहिल्यानंतर नवरी संतापते, स्टेज सोडून निघून जाते आणि शेवटी लग्न नाकारते. मंडपात आलेली वरात मग नवरीशिवायच परत जाते.

या व्हिडीओवर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले, “पहिल्या बायकोला न्याय मिळायलाच हवा.” दुसरा म्हणतोय “घटस्फोटाशिवाय दुसरं लग्न? हा तर गुन्हाच!” तिसरा म्हणतो, “नवरीनं बरोबर निर्णय घेतला.” तर एकाने म्हटले, “मुलगी वाचली… देवाची कृपा!”, “असे लोक समाजाची फसवणूक करतात, पोलिसांनी कठोर कारवाई करावी.” तर काही लोक हा प्रसंग सिनेमालाही लाजवेल, असा मोठा ड्रामा झाल्याचे म्हणत आहेत. अनेकांनी पहिल्या बायकोची हिंमत कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे.