Indian Wedding Groom Dance: भारतातील लग्न म्हटलं की ते डान्सशिवाय अपूर्ण आहे. मग ती मिरवणूक असो किंवा वधू-वर, लोकं जोरदार नाचतात. लग्नसोहळा म्हटलं की फक्त रितीरिवाज नाहीत, तर मस्ती, नाचगाणी, गोंधळाशिवाय लग्न पूर्णच होत नाही. सोशल मीडियावर असे लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नात सर्वांचं लक्ष हे नवरी अन् नवरदेवाकडेच असतं. लग्न समारंभात गाणी आणि डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढते. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लग्न म्हटलं की आता नवरदेव-नवरीचा डान्स एकदम सामान्य गोष्ट झाली आहे. पण, सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात नवरदेवाने आपल्या लग्नाच्या वरातीत असा धडाकेबाज डान्स केला की पाहणाऱ्यांची अक्षरशः चकित होण्याची वेळ आली. नवरा इतक्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने डान्स करताना दिसतो की, लोक त्याला पाहून थक्कच होतात. त्याचे स्टेप्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झालेत.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, नवरा थेट एखाद्या बॉलीवूड हिरोप्रमाणे वागत आहे. डीजेच्या तालावर तो कोणताही संकोच न ठेवता रस्त्यालाच स्टेज बनवतो आणि जबरदस्त स्टेप्स मारायला सुरुवात करतो. त्याचे एक्स्प्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज इतके कॉन्फिडंट आहेत की पाहणारे विचार करू लागतात, एवढा आत्मविश्वास येतो तरी कुठून?

वरातीत धमाका, नवरदेवाच्या डान्सने मिळवली वाहवा!

नवरदेवाने असे काही डान्स मूव्ह्ज दाखवलेत, जे पाहून वाटतं की त्याने महिनाभर प्रॅक्टिस केली असावी. आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक, मित्र, वरातीतील सगळेच जल्लोष करत आहेत. टाळ्यांचा कडकडाट आणि ओरडून नवरदेवाचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. वातावरण एकदम जणू क्लबच झाल्यासारखंच दिसतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

@ranjeetraiderr15 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारोंनी लाईक आणि मजेदार कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “भाऊने वरातच डिस्को बनवून टाकली.” दुसऱ्याने मजेत कमेंट केली, “स्टाईल करताना कोसळू नये म्हणजे झालं!” तर आणखी एकाने लिहिलं, “इतकी एनर्जी तर आम्ही जिममध्येही लावत नाही!”, अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. हा व्हिडीओ फक्त मजेशीर नाही, तर भारतीय लग्नं किती धमाल आणि रंगतदार असतात हे पुन्हा एकदा सिद्ध करतो.