आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक विक्रमांबद्दल ऐकलं आणि पाहिलं आहे. यामध्ये कोणी सर्वात वेगवान धावण्याचा तर कोणी सर्वात जास्त पुश अप्स मारण्याचा विक्रम केला आहे. असे हजारो वर्ल्ड रेकॉर्डचे व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या पाहण्यात येत असतात. पण सध्या एका व्यक्तीच्या अनोख्या आणि अप्रतिम अशा जागतिक विक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो डोक्यावर फुटबॉल ठेवून त्याला हात न लावता उंच टॉवरवर चढताना दिसत आहे.

टोनी सोलोमनने केला हा विश्वविक्रम – विश्वविक्रम

नायजेरियातील रहिवासी असलेल्या टोनी सोलोमनने नावाच्या व्यक्तीने डोक्यावर फुटबॉलचा तोल सांभाळत एक दोन नव्हे तर तब्बल २५० फूट (७६ मीटर) उंचीच्या रेडिओ टॉवरवर चढण्याचा अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे डोक्यावर असणाऱ्या फुटबॉलला हात न लावता आणि तो खाली पडू न देतो तो टॉवरवर चढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- “मुलीने निर्वस्त्र होऊन VIDEO कॉल केला अन्…,” सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने थेट DSP ला दाखवला ‘तो’ व्हिडीओ

सोलोमनने विक्रमासाठी दोन महिने सराव केला होता. आपल्या पराक्रमाबद्दल बोलताना सोलोमन म्हणाला की, मी हे केवळ स्वतःला आव्हान देण्यासाठी नव्हे तर इतरांनाही देखील अशा महान गोष्टी करण्यासाठी प्रेरित व्हावं म्हणून मी हा विक्रम केला. तर सोलोमन पुढे म्हणाला, “मला हा विक्रम करण्यासाठी सुविधा वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल मी नायजेरियन सिव्हिल डिफेन्स बायलसा स्टेट कमांडचे आभार मानतो”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जागतिक विक्रमाचा व्हिडीओ १३ सप्टेंबरला व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर आत्तापर्यंत या व्हिडिओला १.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लोक सोलोमनने केलेल्या कामगिरीचं नेटकरी कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “त्याचे खूप खूप अभिनंदन” दुसऱ्याने लिहिलं, “खूप धाडस आणि खूप प्रतिभा आहे,” तर तिसऱ्या एकाने लिहिलं “अप्रतिम”