Guru Purnima 2024 Wishes In Marathi : आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याच्या जीवनात गुरूची कमतरता आहे तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात गुरुचा मोठा हातभार असतो. अगदी अंगणवाडीपासून ते जिथे नोकरी करतो तिथेही तुमचे मार्गदर्शन करणारे लोक असतात, त्यातील काहींना आपण गुरु समान मानतो. त्यामुळे गुरू-शिष्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यात भारतीय संस्कृतीत गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.
दरवर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा (आषाढ पौर्णिमा २०२४) ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच तारखेला झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा (व्यास पौर्णिमा 2024) असेही म्हणतात. हा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुंना समर्पित आहे,
यावर्षी २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या विशेष प्रसंगी तुम्ही गुरूंचे आशीर्वाद घेण्यासोबतच आपल्या गुरूंना विशेष मेसेज पाठवून तुम्ही देखील त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, आदर व्यक्त करु शकता, शुभेच्छा देऊ शकता.
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश –
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान, व्यवहार,
विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुंना वंदना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरु जगाची माऊली
सुखाची सुंदर सावली
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
आई-वडिलांसारखे दैवत नाही
अशा माझ्या पालकांना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
आईची माया
बाबांची सावली
हीच आहे आपली
गुरुंची माऊली
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी
देव्हाऱ्यात वात तैवत राहावी, सर्वांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी
गुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु हा मेणबत्तीसारखा असतो
जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
“गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.
आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
गुरु म्हणजे परिस
शिष्य म्हणजे लोखंड
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा