गुरुग्राममधील एका महिलेने बराचवेळ कॅबमध्ये फिरल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता, गेल्या महिन्यात एका पत्रकाराने याचा खुलासा केला होता. ज्योती दलाल नामक महिला गुडगावमधील हुडा सिटी सेंटरजवळ एका कॅबमधून फिरली आणि नंतर ड्रायव्हरबरोबर वाद घातल पैसे देण्यास नकार देत त्याला धमकावले. यावेळी तिने कॅब ड्रायव्हरला विनयभंगाच्या बनावट प्रकरणातही अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आता एका दुसऱ्या घटनेत ज्योतीने ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेची २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
आधी कॅब ड्रायव्हरला फसवले, आता ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला लावला चुना
ही घटना ग्रेस अँड ग्लॅमर पार्लरमध्ये घडली आहे. हे पार्लर परिसरातील प्रोफेशनल लक्झरी पार्लरपैकी एक असल्याचे मानले जाते. ज्योतीच्या नव्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणाविषयी पत्रकार दीपिका भारद्वाज यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ग्रुरुग्राम : ज्योती दलाल यांनी पुन्हा असे केले. व्हिडीओमध्ये ज्योती दलाल ब्युटी पार्लरमध्ये पेमेंट प्रोसेसला उशीर करताना आणि नंतर २० हजार रुपये न भरता सर्व सर्व्हिस घेऊन निघून जाताना दिसत आहे.
पार्लरमध्ये तब्बल नऊ तासांची घेतली सर्व्हिस
ज्योती दलाल दुपारी गुरुग्राममधील एका पार्लरमध्ये गेली आणि पूर्ण नऊ तास म्हणजे रात्र होईपर्यंत सेवा घेतली. दुपारी १ ते १० वाजेपर्यंत तिने अनेक सुविधांचा लाभ घेतल्यानंतर आधी तिने रात्री ११ वाजेपर्यंत पैसे देते असे सांगितले आणि नंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
आता व्हायरल व्हिडीओमध्ये ज्योती दलाल ही महिला ब्युटी पार्लरमधील स्टाफशी पैसे देण्यावरून वाद घालताना दिसत आहे. यावेळी एक स्टाफ मेंबर तिचा व्हिडीओ काढत असतो, तर त्यालाही तिने रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.