तुम्ही कधी चोराला स्वतःच्याच जाळ्यात अडकताना पाहिलं आहे का? नाही? तर आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हालाही हसू आवरत नाही. तसे, तुम्ही चोरीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर सध्या चोरीचा जो व्हिडिओ दिसत आहे, ते पाहून तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रत्यक्षात असे काही घडले की, महिलेची पर्स हिसकावून घेण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती बसमध्ये चढला होता. ती बसमध्ये चढताच त्या व्यक्तीने महिलेची पर्स हिसकावून घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो पर्स हिसकावू शकला नसला तरी लगेचच त्याने पुन्हा पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदाही तो पर्स चोरण्यात अयशस्वी ठरला, त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तो माणूस उतरण्यासाठी बसच्या दाराकडे येताच चालकाने दरवाजा बंद केला आणि चोर बसमध्येच अडकला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: मुसळधार पावसात ‘तो’ घराच्या बाहेर पडला अन् वीज पडली, काही क्षणांचा फरक आणि तरुण…
हा गुन्हा करण्यासाठी एक चोर बसमध्ये चढल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर त्याचा साथीदार म्हणजेच दुसरा चोर दरवाजा बंद करू नये म्हणून खाली उभा होता. पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करणारा चोरटा पळून जाणारच होता की लगेचच गेट बंद झाले. त्याच्या साथीदाराने गेट बंद होण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते शक्य झाले नाही. कारण बस सुटली होती. यानंतर ड्रायव्हरने त्याची चांगलीच धुलाई केल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी ड्रायव्हारने दाखवलेल्या हुशारीचं कौतुक केलं आहे.