Guru Purnima 2025 Wishes in Marathi: हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. हिंदू धर्मात गुरूला विशेष स्थान असून, गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा मोठा सण आणि मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा हा सण गुरुवारी, १० जुलै रोजी आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यांनी वेदांचे वर्गीकरण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता आणि अनेक पुराणांची रचना केली. गुरु आणि शिष्य यांचे पवित्र नाते दृढ करण्याचा हा दिवस आहे. गुरू म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, तर जीवनात अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक असतो. आणि अशा गुरूंच्या सन्मानार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनातील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तीला गुरूंना नमन करण्याचा पवित्र दिवस. अशा या दिवशी गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. मग यंदा आपल्या गुरुजनांना द्या हटके शुभेच्छा! सोशल मीडियावर शेअर करता येतील असे खास, विचारपूर्वक आणि मनाच्या गाभ्यातून आलेले संदेश आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. WhatsApp, Facebook, Instagram अशा सर्व प्लॅटफॉर्म्सवर हे मेसेज सहज शेअर करता येतील. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्या गुरूंच्या मनाला स्पर्श करणाऱ्या या सुंदर शुभेच्छांवर एक नजर टाकाच…
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश; गुरुजनांसाठी खास मेसेज
ज्ञानाचा दीप लावणारे,
अंधारातही योग्य दिशा दाखवणारे,
अपयशाचे यशात रूपांतर करणारे,
आणि जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्गदर्शक ठरणारे…
असे सर्व माझ्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी मला घडवलं,
या कठीण जगात लढायला शिकवलं…
चुकताना थांबवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं,
आणि या जीवनात खऱ्या अर्थानं ‘जगायला’ शिकवलं…
अशा माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नि:स्वार्थ सेवा, नितांत श्रद्धा,
गुरूच्या पायांतच दडलेली सच्च्या भक्तीची सत्ता.
तोच देव, तोच दाता,
ज्यांनी शिकविली आम्हाला नीतिमत्ता
जीवनाला दिशा देणारा सत्याचा प्रवक्ता!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण,
गुरू म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन,
या पवित्र दिवशी गुरूंना करूया स्नेह अर्पण ,
त्यांच्या कृपाछायेतच होऊ दे सुंदर जीवन
या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना शतशः वंदन!

गुरू आहेत सर्वांत महान,
शिकवतात शहाणपण, देतात जीवनाला नवा आयाम!
ना भेदभाव, ना अपेक्षा
देतात फक्त नि:स्वार्थ प्रेम आणि दिशा
या पावनप्रभात गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंना खास मराठीतून मेसेज, स्टेटस आणि शुभेच्छा संदेश पाठवून कृतज्ञता व्यक्त करु शकता.