Raksha Bandhan Wishes Messages Quotes: अर्थपूर्ण भावबंध, प्रेमाची रेशीमगाठ आणि आठवणींनी भारलेलं नातं… या साऱ्यांचा संगम असलेला एक हृदयस्पर्शी सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण केवळ एका राखीपुरता मर्यादित नाही, तर तो बहीण-भावाच्या नात्याचा गूढ, हळवा व नाजूक प्रवास अधोरेखित करतो. प्रेम, विश्वास, सुरक्षा व आदर या भावना ज्या एका नात्यात एकत्र गुंफलेल्या असतात, त्याचा उत्सव म्हणजेच रक्षाबंधन.

दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. या शुभ दिवशी अनेक जण आपल्या लाडक्या बहिणीला किंवा भावाला मनःपूर्वक शुभेच्छा देतात, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहितात आणि संदेशाद्वारे प्रेम व्यक्त करतात. या रक्षाबंधनाला तुमचंही मन ओथंबून वाहत असेल, आठवणी पुन्हा जाग्या होत असतील ना… तेच लक्षात घेऊन खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हृदयात जपून ठेवण्यासारख्या, बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देणाऱ्या रक्षाबंधनाच्या सुंदर शुभेच्छा! चला तर पाहूयात बहीण-भावाच्या या नात्याचा आनंद अधिक द्विगुणीत करणारे मराठमोळे संदेश…

तुमच्या भावा-बहिणीला पाठवा हे खास मराठी शुभेच्छा संदेश

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण,
बहीण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ बहीण-भावाच्या प्रेमात आहे
म्हणूनच भाऊ-बहिणीच हे नातं जगात खूप खूप गोड आहे
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ताई-भावाचं हे नातं,
कधी रागाचं, कधी प्रेमाचं;
पण शेवटी जीवापाड जपलेलं!
राखीच्या धाग्यातून उमटतं आपुलकीचं नातं…
रक्षाबंधनाच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा!

भावा, तुझा राग, तुझं प्रेम, तुझं रक्षण… सगळंच गोड आहे
या राखीच्या दिवशी तुला सांगते… तुझ्यासारखा भाऊ मिळणं म्हणजे भाग्य आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं ते अतूट असं बंधन आहे…
हळव्या नात्याच्या धाग्यावर उमलणारं,
अलवार स्पंदन आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राखीच्या धाग्यात गुंफलेलं असतं
अनेक आठवणींचं गाठोडं…
त्या आठवणींसोबत येते प्रेम, हक्क आणि माया!
अशा या पवित्र नात्याच्या दिवशी,
रक्षाबंधनाच्या सुंदर आणि मंगलमय शुभेच्छा!

अशाप्रकारे या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची वीण अजून घट्ट करा. वरील गोड, हटके आणि मनस्पर्शी शुभेच्छा पाठवा आणि त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवा…