Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये भेळचा एक नवा प्रकार दिसून आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डान्सिंग भेळ बनवताना दिसत आहे. तुम्हाल वाटेल की ही डान्सिंग भेळ म्हणजे नेमकं काय? तर त्यासाठी तुम्हाला सुरूवातीला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
भेळ हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना आवडतो. तुम्ही आजवर भेळचे अनेक प्रकार पाहिले असेल पण तुम्ही कधी डान्सिंग भेळ कधी पाहिली का? आज आपण या भेळच्या नव्या प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भेळ बनवताना दिसत आहे. ही व्यक्ती ज्या प्रकारे भेळ बनवत आहे, ते पाहून कोणीही अवाक् होईल. डान्स करत ही व्यक्ती भेळ बनवताना दिसत आहे. त्यामुळे या भेळ ला डान्सिंग भेळ म्हणतात. या भेळची विशेषत: म्हणजे ६० पदार्थांपासून ही भेळ बनवली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओच्या शेवटी जेव्हा ही व्यक्ती भेळ बनवून देते तेव्हा ती भेळ पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. कारण ती भेळ खूप अप्रतिम दिसते. सध्या या डान्सिंग भेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

हेही वाचा : VIDEO: खळबळजनक! भटक्या कुत्र्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला; ‘ती’च्या धाडसामुळे बचावले तरुणाचे प्राण

aapkabhai_foody या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डान्सिग भेळ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. एका युजरने विचारलेय, “हे दुकान कुठे आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स करता काका” आणखी एका युजरने लिहिलेय, “कामात आनंद घेता येणे, यासारखे दुसरे सुख कोणतेही नाही. अनेक युजर्सनी या भेळ विक्रेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही लोकांना भेळ तयार करण्याची स्टाईल खूप आवडली आहे.