डॉक्टरांकडे गेल्यानंतर लहान मुलांना सर्वात जास्त भीती वाटते ती इंजेक्शनची. लहान मुलच काय तर काही मोठी मंडळी देखील इंजेक्शनला घाबरतात. डॉक्टर लांबून दिसले तरी काही लहान मुलं रडायला सुरूवात करतात, तर इंजेक्शन देताना तर त्यांना सांभाळणे पालकांनाही कठीण होते. असाच एका डॉक्टराचा लहान मुलाला इंजेक्शन देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील डॉक्टराची इंजेक्शन देण्याची पद्धत तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘डॉ. हाय फाय’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हे डॉक्टर लहान मुलाला खेळवत, त्याला खेळण्यामध्ये व्यस्त करत अशाप्रकारे इंजेक्शन देतात की त्या लहान मुलाला समजत नाही. तसेच जेव्हा त्याला इंजेक्शनच्या वेदना होतात, तेव्हाही डॉक्टर लगेच त्याला खेळणे दाखवून शांत करतात. यामुळे हा चिमुकला इंजेक्शन घेऊनही अजिबात रडत नाही. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

व्हायरल व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा: बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा

या इंजेक्शन देण्याच्या पद्धतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.