Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा बाप-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलगा पोलीस भरती झाला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टोलनाक्यावर वडील झाडू मारण्याचं काम करत असतात, आणि त्याचवेळी स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद घेऊन बातमी घेऊन मुलगा विशाल टोलनाक्यावर वडिलांना सांगण्यासाठी येतो. हा मुलगा पोलीस भरतीत पास झालेला आहे, आणि हीच आनंदाची बातमी सांगण्यासाठी तो वडिलांच्या कामाच्या ठिकाणी येतो. यावेळी वडिलांनी त्याच्यासाठी आयुष्यभर केलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात, तर वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. दोघेही बाप-लेक ज्या क्षणाची वाट बघत होते, जे स्वप्न पाहिलं होतं ते अखेर पूर्ण झालं होतं.

मुलानं वडिलांना पेढा भरवत हा आनंद साजरा केला यावेळी, तिथे उपस्थित असलेल्यापैकी कुणीतरी हा व्हिडीओ काढला, त्यानंतर हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/CuJH0RIoeF_BEA2uHQ-RgBo-d7cpXTpLy8AEIs0/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

हेही वाचा – ८० लाख वेळा लिहीले रामाचे नाव; वयाच्या ९४ व्या वर्षीही सुब्बलक्ष्मी यांची अद्भुत भक्ती

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. बापनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.