Couple Punished for Love Marriage: प्रेम केलं… पण त्याची किंमत इतकी भीषण असेल, याची कल्पनाही नसेल. एक तरुण-तरुणी प्रेमात पडले आणि पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं होतं. गावकऱ्यांनी त्यांना न्यायाच्या नावाखाली अशा अमानवी अत्याचारांना सामोरं जावं लागलं की, हा काळा अध्याय पाहून तुमचंही काळीज हादरेल. व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतील…

ओडिशामधील रायगड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना समोर आली आहे. आदिवासीबहुल कंजमाजोडी गावात एका प्रेमी युगुलावर केवळ एकाच गोत्रात विवाह केल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी थेट ‘कंगारू न्यायालय’ बसवून थरकाप उडवणारी शिक्षा दिली. त्यांच्या ‘गुन्ह्याची’ शिक्षा अशी की, त्यांनी नांगर खांद्यावर घेऊन, बैलासारखे शेतात काम करावे. आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही… पुढे जे घडलं, ते अधिक भयावह होतं. आता सोशल मीडियावर या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका तरुण-तरुणीला बैलासारखं वागवलं जात आहे. या प्रेमी युगुलाला नांगर खांद्यावर घेऊन शेतात जुंपलं गेलंय आणि गावकरी त्यांच्यामागे चालत त्यांचा अपमान करीत आहेत.

लक सारका आणि कोडिया सारका हे या प्रेम प्रकरणातील प्रेमी युगुल एकमेकांशी प्रेमसंबंधात होते. मात्र, स्थानिक रिवाजांनुसार ते मावशी (पिउसी नानी) आणि भाचा अशा नात्यात येतात. आदिवासी परंपरेनुसार, एकाच गोत्रात विवाह करणे म्हणजे थेट रक्तसंबंधासारखं मानलं जातं आणि याला तेथे कठोर मनाई आहे.

शुक्रवारी व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओत, गावातील वयोवृद्ध आणि इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोघांना सार्वजनिकरीत्या अपमानित केलं गेल्याचं दिसतं. शेतात नांगराला जुंपल्यानंतर ग्रामदेवतेसमोर पूजा-अनुष्ठान करून, त्यांना फटके मारण्यात आले आणि अखेर दोघांना गावाबाहेर हाकलून देण्यात आले. सध्या ते कुठे आहेत याची कोणतीही माहिती नाही. ही संपूर्ण घटना रायगड जिल्ह्यातील शिकारपाई पंचायतमधील कंजामाजोडी गावात घडली आहे.

गावातील एका रहिवाशाने सांगितले, “आमच्या परंपरेनुसार एकाच गोत्रात विवाह म्हणजे भाऊ-बहीण किंवा अत्यंत जवळच्या नात्यांसारखं मानलं जातं. त्यामुळे हा संबंध आमच्यासाठी निषिद्ध आहे.”

हा न्याय संपूर्ण गावासमोर पार पडला आणि त्याचे भयावह दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, अधिक धक्कादायक बाब म्हणजे अद्याप कोणत्याही आरोपीवर कायदेशीर कारवाई झालेली नाही. रायगडच्या पोलीस अधीक्षक स्वाती एस. कुमार यांनी सांगितलं, “ही घटना गंभीर आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी पथक पाठविण्यात येईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

एका समाजाच्या रूढींच्या नावाखाली माणुसकीचा असा संपूर्ण विनाश? या अमानुष शिक्षेचा व्हिडीओ पाहून तुमचेही मन सुन्न होईल… प्रेम करण्याची किंमत इतकी भयंकरही असू शकते का?