आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही अपघात असे असतात जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारे येतात. सध्या अशाच एका धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर हा अपघात पाहिल्यानंतर वाहन चालवताना आपण रस्त्यावर पूर्ण लक्ष दिलं नाहीतर मोठ्या अपघाताला कसं सामोरं जावं लागत हे याचा धडा मिळत आहे.

शिवाय वाहन चालवताना थोडी सावधगिरी बाळगली गेली नाही तर किती मोठा अपघात होऊ शकतो हे देखील व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नक्की कोणाची चूक आहे? असा प्रश्न हा व्हिडीओ शेअर करताना विचारण्यात आला आहे. कारण या व्हिडीओत, एक लाल रंगाची कार भरधाव वेगाने येत असताना रस्त्यामध्ये अचानक एक कुत्रा आडवा आल्याने कारचालक ब्रेक मारतो, याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारा बाईकस्वार कारला इतक्या जोरात धडक देतो की, तो थेट कारच्या बोनेटवर येऊन पडल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- बिबट्याने घरात घुसून कुत्र्यावर केला हल्ला; व्हायरल CCTV फुटेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल

बाईक कारला धडकली –

हेही पाहा- “पप्पी…” मुलींना पाहताच मुलांची शिट्या वाजवत अश्लील घोषणाबाजी; Video पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ caraccident नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाईकस्वार कारला धडकल्यामुळे थेट कारच्या समोरील काचेवर जोरात आदळल्याचं दिसत आहे. तो माणूस पडल्याने कारची काच फुटल्याचंही दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हा अपघात बाईक चालकाच्या चुकीमुळे झाल्याचं म्हटलं आहे. जर त्याने वेळेवर आणि समोर लक्ष दिले असते तक तो बाईक कंट्रोल करु शकला असता आणि अपघात झाला नसता असंही नेटकरी म्हणत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. एकाने कुत्र्याला वाचवण्याच्या नादात अपघात झाल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने बाईकचालकाचे समोर लक्ष नसल्याने अपघात झाल्याचं म्हटलं आहे.