Chattrapati Sambhaji Nagar school viral video : आजकाल परदेशी भाषा शिकणे किंवा बोलणे ही सामन्य गोष्ट आहे पण अजूनही हा बदल सहसा शहरी भागात पाहायला मिळतो. शहरातील शाळांमध्ये अनेकदा परदेशी भाषांचे शिक्षण दिले जाते. तसेच परदेशी भाषा शिकवणारे अनेक संस्था शहरामध्ये असतात जिथे अनेक तरुण-तरुणी ही विविध परदेशी भाषांचे शिक्षण घेतात पण ग्रामीण भागात जिथे मुलभूत शिक्षण देखील अनेक अडचणीवर मात करून दिले जाते तिथे परदेशी भाषा शिकणे किंवा त्याचे शिक्षण घेणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. परदेशी भाषेची ओढ शहरातील मुलांना जितके शहरातील मुलांना असते तितकी ग्रामीण भागातील मुलांना नसते असा समज गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सर्वांच्याच मनात आहे. पण हाच समज पुसून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एका दुर्गम भागातील एका शाळेने आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील असे गाव जिथे मुलं बोलतात जपानी भाषा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गडिवाट या छोट्याशा गावातील शाळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या गावातील शाळेतली लहान मुलं इंग्रजी किंवा हिंदी नव्हे, तर अगदी फटाफट जपानी भाषा बोलतात! त्यांच्या बोलण्यातली आत्मविश्वासपूर्ण शैली आणि ज्ञान पाहून सोशल मीडियावर सर्वजण थक्क झाले आहेत.
मुलांची आत्मविश्वासपूर्ण स्वप्नं (Children’s Confident Dreams)
इंस्टाग्रामवरील @sidiously_ (सिद्धेश लोकरे) या कंटेंट क्रिएटरने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो सांगतो, “आज मी छत्रपती छत्रपती संभाजीनगरपासून २०० किमी प्रवास करून गडिवाट गावात आलो आहे, जिथे मुलांना जपानी शिकवली जाते.” या व्हिडिओत मुलं जपानीत सहज संवाद साधताना दिसतात. एका विद्यार्थ्याने सांगितले, “जर आपण जपानी बोलू शकतो, तर आपण जपानमध्ये कामही करू शकतो.”
शिक्षकांची नवी वाट – YouTube ते ChatGPT (Teacher’s Innovative Path – From YouTube to ChatGPT)
या शाळेचे शिक्षक नवपुते सर सांगतात, “या मुलांचे पालक शेतात मजुरी करतात, पण आमच्या शाळेत कोणीही गरीबीबद्दल तक्रार करत नाही. आमची मुलं म्हणतात — आईवडील शेतात मेहनत करत असतील, तर आमचं कर्तव्य म्हणजे अभ्यासात मेहनत घेणं.” त्यांनी पुढे सांगितलं की त्यांनी रोबोटिक्सचं शिक्षण YouTube आणि ChatGPT च्या मदतीने दिलं आहे.
व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम, त्यांचा आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्य देखील दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेक नेटिझन्स या शाळेचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहे. ही शाळा पुढील पाच वर्षांत देशातील सर्वोत्तम शाळांपैकी एक बनवण्याचं ध्येय ठेवून काम करत आहे. एका छोट्या गावातील ही प्रेरणादायी कहाणी आता संपूर्ण भारताला शिक्षणातील नवा दृष्टिकोन देत आहे.
सोशल मीडियावर का चर्चेत येतेही ही शाळा
ही घटना मुंबई, पुण्यासारख्या शहरात नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरच्या गडिवाट या छोट्या गावात घडली आहे. ग्रामीण भागात जिथे मूलभूत सुविधा मिळणंही आव्हानात्मक असतं, तिथं मुलं जपानीसारखी अवघड परदेशी भाषा फटाफट बोलतात, हीच आश्चर्यकारक गोष्ट आहे. ही शाळा दर्शवते की, चांगलं शिक्षण फक्त शहरांतच मिळतं ही धारणा चुकीची आहे. येथील विद्यार्थी शेतमजुरांच्या घरातून असूनही, रोबोटिक्स आणि जपानी भाषा शिकत आहेत म्हणजेच तंत्रज्ञान आणि ज्ञान दोन्ही हातात घेत आहेत.
जपानी भाषा शिकल्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर आंतरराष्ट्रीय रोजगार आणि शिक्षणाच्या संधी खुल्या होतात. ग्रामीण भारतातूनही मुलं जगाशी जोडली जाऊ शकतात, हा संदेश व्हिडीओमधून मिळतो आहे. शिक्षकांनी YouTube आणि ChatGPT सारख्या आधुनिक साधनांचा वापर करून मुलांना शिकवलं, हे दर्शवतं की तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण (Democratisation of Education) आता खरोखर शक्य आहे. या शाळेची गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे ,कारण ते खऱ्या अर्थाने दर्शवते की संसाधनं कमी असली तरी इच्छाशक्ती आणि प्रयत्न मोठे असतील तर बदल घडवता येतो.