काही साप अत्यंत विषारी आणि धोकादायक असतात. म्हणूनच नेहमी सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील. सापांशी संबंधित व्हिडीओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ खूपच आश्चर्यकारक असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तुम्ही असे अनेक कार्यक्रम पाहिले असतील, जिथे सापांची सोडवणूक करणारे काही प्रोफेशनल माणसे सापांचा बचाव करतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका स्कुटीच्या आतमध्ये हा साप लपून बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Photos : रक्षाबंधनानिमित्त घातलेल्या ड्रेसमुळे निया शर्मा ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आज तरी…”

या स्कुटीमध्ये लपलेला हा साप बाहेर काढण्यासाठी सेस्क्यू टीमला बोलावण्यात आले होते. दरम्यान, ही संपूर्ण घटना शूट करण्यात आली आणि हा व्हिडीओ युट्युबमध्ये पोस्ट करण्यात आला आहे. साप आणि त्याला वाचवणारा माणूस यांच्यातील संघर्ष बराच काळ सुरू असतो. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा साप स्कूटीतून बाहेर पडायला तयार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर हा माणूस सापाला स्कूटीतून बाहेर काढण्यात यशस्वी होतो. ती व्यक्ती सापाला एका बाटलीत घेते आणि त्याला राहण्याच्या ठिकाणी सोडण्यासाठी घेऊन जाते. हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडीओला लाइक देखील केले आहे.