Viral Video : सध्या सीताफळाचा हंगाम सुरू आहे. सीताफळ हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर फळ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सीताफळ खायला आवडते. सीताफळात बिया भरपूर असतात त्यामुळे अनेक लोकांना सीताफळ खायला अवघड जाते, सीताफळाच्या बिया काढून सुद्धा सीताफळ नीट खाता येत नाही. अशावेळी सीताफळाच्या बिया कश्या काढाव्यात, असा प्रश्न पडतो पण सीताफळाच्या बिया काढणारी एक अनोखी पद्धत सध्या चांगली चर्चेत आली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने कश्या काढाव्यात, हे सांगितले आहे .
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक सीताफळ दाखवले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चमच्याने सीताफळातील बिया काढताना दिसत आहे. त्यानंतर या बिया चॉपरमध्ये टाकतात. चॉपरचा वापर करुन तुम्ही सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने वेगळ्या काढू शकतात ज्यामुळे तुम्हाला बियांशिवाय सीताफळाचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : ढोल ताशावर थिरकला कटप्पा; कटप्पाचा जबरदस्त डान्स VIDEO होतोय व्हायरल
aaj_kayy_special या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने कश्या काढाव्यात?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सना ही पद्धत आवडली नाही.अनेक युजर्सनी या व्हिडीओवर टीका केली आहे. एका युजरने लिहिलेय, ” या पेक्षा हाताने खाल्लं तर परवडतं..” तर एका युजरने लिहिलेय, “माझं अडीच वर्षाचा मुलगा हाताने सीताफळ खातो आणि बिया पण काढून टाकतो”