How Traffic Camera Works: वाहन चालवताना आपल्याला रहदारीच्या निमयांचं पालन करावं लागतं. आपण जर ट्रॅफिक रुल्स फॉलो केले नाहीत तर आपल्या नावे ट्रॅफिक चालान जारी केलं जातं. यासाठी ठिकठिकाणी, ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जर तुम्ही मुंबई पुणे आणि दिल्ली यासारख्या मेट्रो शहरांमध्ये राहत असाल तर प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे कधी तुम्ही एखादा वाहतुकीचा नियम पाळला नाही आणि तुम्हाला वाहतूक पोलिसाने अडवलं नाही तर त्याने खूश होऊ नका. कारण कदाचित तुमची ही चूक ट्रॅफिक कॅमेरा किंवा ट्रॅफिक पोलिसाने आपल्या फोनमध्ये कैद केलेली असू शकते. त्यानंतर काहीच वेळात तुमच्या नावे ऑनलाईन चालान जारी केलं जाऊ शकतं.

कशी असते तुमच्यावर करडी नजर

जर एखाद्या व्यक्तीने ट्रॅफिक सिग्नल तोडून वेगाने पुढे गेला तर ट्राफिक कॅमेरे ऑटोमॅटिक चलन तयार करतात आणि तो व्यक्ती राहत असलेल्या घरच्या पत्त्यावर हे चलन त्याला पाठवून देतात. रस्त्यावरील वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर नियमानुसार दंड भरावा लागतो. वाहतूक पोलिसांनी बसवलेल्या ट्रॅफिक कॅमेऱ्याची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळे जी व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल त्या व्यक्तीची सुटका होणे शक्य नाही. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

ट्रॅफिक कॅमेरा नेमकं कसं करतो काम –

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीची नेमकी ओळख पटावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे २ मेगापिक्सल आणि उच्च रिझोल्यूशनचे आहेत. तसेच हे कॅमेरे ६० डिग्रीपर्यंत वळू शकतात आणि आसपासचा परिसर पूर्णपणे कव्हर करू शकतात. यामुळे तुम्ही जर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर कॅमेऱ्याच्या नजरेतून तुमची सुटका होणे खूपच अवघड आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाने पाळलेच पाहिजे.

डेटा पूर्णपणे सुरक्षीत

या ट्राफिक कॅमेराच्या माध्यमातून वाहनांच्या वेगाची सुद्धा माहिती मिळते. वाहतूक पोलिसांचे वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्राफिक कंट्रोल रूममधून ते कॅमेरे ऑपरेट केले जातात. यासाठी एक विशेष डाटा एक्सप्रेस सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आलेले छायाचित्र आणि व्हिडिओज पुरावे देखील सुरक्षित ठेवले जात आहेत याचं कारण काही मोठा वाद निर्माण झाला तर या पुराव्याला कोर्टासमोर सादर केले जावे त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून डेटाची पूर्ण काळजी घेतली जाते.

हेही वाचा – WhatsApp स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रॅफिक कॅमेरा आहे एकदम अचूक

अनेकदा आपल्याला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे खाब होऊ शकते आणि चुकीच्या पद्धतीने काम करु शकते. परंतु ट्रॅफिक कॅमेरा अत्यंत अचूक आहे. यासाठी सर्वप्रथम दोन टप्प्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं. यामध्ये सर्वप्रथम स्वयंचलित पद्धतीनं माहितीची खात्री केली जाते. यामुळे तुम्ही खरंच वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं आहे की नाही? याची माहिती होते. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मॅन्युअली पद्धतीनं तपासलं जातं. त्यामुळे या कॅमेऱ्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही.