Shocking video: साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. यावेळी काही लोकांनी या अजगराला अक्षरश: दगडानं ठेचण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हैदराबादच्या घाटकेसरमध्ये रस्त्याच्या मधोमध एक मोठा अजगर बाहेर आला होता. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्याच्या मधोमध अजगर अचानक रस्त्यावर आल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. व्हिडिओमध्ये पुढे दाखवले आहे की एक तरुण सापावर मोठ्या दगडाने हल्ला करतो.हैदराबादमधील घाटकेसरजवळील प्रतापसिंगराम येथे ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सापाला पाहून लोक घाबरले आणि त्यांनी दगडफेक करून आणि काठ्यांनी मारहाण करून अजगराला मारण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रस्त्याच्या मधोमध स्थानिक लोकांनी सापाला घेरले आहे. जमावातील एका तरुणाने डोक्यावर एक मोठा दगड उचलला आणि तो सापावर फेकला. मात्र, तो सापाला लागला नाही. यानंतर अजगर पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि तरुण पुन्हा तो दगड उचलतो आणि सापाला मारतो. यानंतर साप हल्ल्यातून निसटतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडुपात जातो. गावकऱ्यांनी सापाला मारले की जिवंत सोडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्थानिकांनी असा दावा केला आहे की गेल्या काही दिवसांपासून अजगर गावाच्या बाहेर फिरत होता आणि त्यांना सापाच्या हल्ल्याची सतत भीती वाटत होती.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  दरम्यान गावकऱ्यांनी सापाचे प्राण वाचवायला हवे होते आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वन विभागाला फोन करायला हवा होता. मानवांनी प्राण्यांसोबत सुसंवाद साधून, निसर्गातील त्यांच्या स्थानाचा आदर करून एकत्र राहण्यास शिकले पाहिजे. अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.