Viral Animal Video Hyena Cheetah: जंगलात काय घडेल याचा काही नेम नाही. कधी हिंस्र संघर्ष, कधी निसर्गाची करामत, तर कधी मजेशीर क्षण… अशा अनेक व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होऊन लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय, ज्यात दिसतंय असं काही, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.” नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
सध्या सोशल मीडियावर एक थरारक आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत असं काही घडलं आहे, जे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. सामान्यतः जंगलाचा सर्वात चपळ व भयानक शिकारी समजला जाणारा चिता, या व्हिडीओत तरसासामोर इतका कमकुवत भासतो की तो सरळ पळ काढतो.
काय आहे या व्हिडीओत?
या व्हायरल व्हिडीओत दिसतं की, तीन चित्ते एका शिकारीवर झडप घालून एकत्र बसून खात आहेत. शिकार पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे आणि वातावरण शांत आहे. पण, काही क्षणातच जंगलातला एक चालाख आणि खतरनाक शिकारी तरस तिथं दाखल होतो. त्याची एंट्री इतकी दमदार असते की तीनही चित्ते गडबडून जातात. तरस अजिबात वेळ न घालवता थेट शिकारीकडे झेपावतो आणि… आश्चर्य म्हणजे, तीन चित्ते त्याच्यावर हल्ला न करता सरळ तेथून पळ काढतात. तरस एकटा असूनही इतका आत्मविश्वासाने वावरतो की तो त्या चित्त्यांच्या शिकारावर आपला कब्जा मिळवतो.
लोक काय म्हणाले?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी म्हटलं, “जंगलात केवळ ताकद उपयोगी पडत नाही, तर आत्मविश्वास आणि दबदबाही महत्त्वाचा असतो.” काही युजर्सनी आश्चर्याने विचारलं, “चित्ते एवढे भित्रे असतात का की एका तरसाला पाहून पळ काढतात?” तर काहींनी हे जंगलातील “निसर्गनियम” म्हटलं म्हणजेच, कोणत्या वेळी लढायचं आणि कोणत्या वेळी माघार घ्यायची हे प्रत्येक प्राणी जाणतो.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ लाखोंच्या संख्येने पाहिला आणि शेअर केला जात आहे. हे दृश्य केवळ रोमांचक नाही, तर ते जंगलातील वास्तव आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. इथे “ताकदवान तोच, जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो.”
तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? चित्ते मागे हटले यावर तुमचं मत काय?