आठ वर्षीय पाकिस्तानी चाहत्याने विचारले की त्याला भविष्यात संघाचे नेतृत्व करायचे आहे आणि संघातील सर्व खेळाडूंचे ऑटोग्राफ हवे आहेत. आझमने आपल्या छोट्या चाहत्याला उत्तर देताना सांगितले की, तो फोकस, विश्वास आणि मेहनतीने सर्व काही साध्य करू शकतो. त्याचवेळी आझमने त्याला भविष्यातील कर्णधार असेही संबोधले.
काय म्हणाला बाबर आझम?
आझमने लिहिले, “प्रिय मोहम्मद हारून सुरिया, सलाम – आम्हाला इतके मनापासून पत्र लिहिल्याबद्दल चॅम्पियन धन्यवाद. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही तुमचे लक्ष, विश्वास आणि कठोर परिश्रम घेऊन काहीही साध्य करू शकता. तुम्हाला ऑटोग्राफ मिळतील, पण भविष्यातील कॅप्टन, तुमचे ऑटोग्राफ मिळण्यासाठी मी थांबू शकत नाही.”
( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )
( हे ही वाचा: T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली… )
सुपर १२ फेरीत सलग पाच सामने जिंकून पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली, मात्र तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये आझमद्वारे शानदारची कप्तानी पाहिली गेली. ज्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आझमचे कौतुक केले आणि म्हटले की तो पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक होऊ शकतात.