आपल्या देशात जिथे आजही हजारो तरुण बेरोजगार आहेत. अनेकांना कित्येक ठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळत नाही तर दुसरीकडे असेही लोक आहेत जे क्षुल्लक कारणावरून नोकरी सोडतात. एवढंच नाही तर नोकरीच्या पहिल्या दिवशीच राजीनामा देतात. असाच काहीसा प्रकार घडल्याचे नुकतेच समोर आले आहे.
नोएडा-आधारित एचआर प्रोफेशनल खुशी चौरासियाने आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये कर्मचाऱ्याच्या वर्तूणकीबाबत आलेला अनुभव शेअर केला आहे. नोकरीच्या पहिल्या दिवशी नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याबाबात तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. चौरसिया यांनी आपल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की,”सेल्समन म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचार्यानने नोकरीच्या पहिल्या दिवशी नोकरी सोडली. जेव्हा नोकरी सोडण्याचे कारणत्याने चौरसियाला सांगितले ते ऐकल्यानंतर तिला प्रथम धक्का बसला. सोशल मीडियावर चॅट शेअर करत तिने रोष व्यक्त केला आहे.
मला हे काम आवडले नाही असा मेसेज करत कर्मचाऱ्याने नोकरीच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला. चौरसिया यांनी नमूद केले की,”सेल्समनचे काम सोपे नाही परंतु नोकरी स्विकारण्यापूर्वीय कामाबाबत सर्व बाबी स्पष्टपणे कळविण्यात आल्या होत्या. एका रात्रीत असे काय झाले की त्याने आपले मन बदलले, याबाबत पोस्टमध्ये विचारणा करत तिने आश्चर्य व्यक्त केले.

नोकरी शोधणाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशात, चौरसिया यांनी या गोष्टीवर भर दिला की, कोणतीही भूमिका पहिल्या दिवशी परिपूर्ण वाटत नाही. “कोणतीही कंपनी २४ तासांत सर्वकाही सिद्ध करू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा आणि मानसिकता देत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका कधीही ‘आरामदायक’ वाटणार नाही,” असे तिने लिहिले.

मुलाखती दरम्यान योग्य प्रश्न विचारण्यासाठी आणि नोकरी स्वीकारण्यापूर्वी विचार करण्यासाठी वेळ घेण्यासाठी तिने नोकदी शोधणाऱ्यांना प्रोत्साहित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिने लोकांना मागे हटतानाही व्यावसायिक मुल्य राखण्याचे आवाहन केले. चौरसिया यांनी त्यांच्या पोस्टचा शेवट एका आठवणीने केला: “परिपूर्ण नोकरीमधून प्रगती होत नाही. ती संयम, स्पष्टता आणि मनाला न पटणाऱ्या गोष्टीतून शिकण्यामुळे येते.”

ही पोस्ट, ज्यामध्ये आता माजी कर्मचाऱ्याबरोबर झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट देखील होता, तो आता व्हायरल झाला आहे. लिंक्डइन वापरकर्ते या घटनेवरून वाद पेटला आहेत. अनेकांनी एचआरच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले, तर काहींनी म्हटले की उमेदवाराने ज्या नोकरीशी त्यांचा संबंध नव्हता त्या नोकरीत राहण्याऐवजी लवकर निघून जाऊन योग्य काम केले म्हणत त्याचे समर्थन केले.
एका वापरकर्त्याने लिहिले, “हे सुपरवायजर नोकरीवर रुजू होणाऱ्या व्यक्तीशी कसे वागते यावर देखील अवलंबून आहे. त्याला मार्गदर्शन करून त्याला आपलेपणाची भावना जाणवली पाहिजे. सेल्समनच्या कामाबाबत सुपरवाजरने नव्याने नियुक्त व्यक्तीला थोडे समजून घेतले पाहिजे. मला वाटते की या प्रकरणात, सुपरवायजरने पहिल्या दिवशी त्याच्यासमोर पूर्ण न होणार्या अपेक्षा ठेवल्या असतील.”
दुसर्याने लिहिले की, “प्रत्येक फ्रेशर सीएक्सओंचे सीव्ही पाहतो आणि त्यांच्यापैकी एक होण्याचे स्वप्न पाहतो, त्यांच्यापैकी प्रत्येकाने ज्या कठीण परिस्थितीतून जावे लागले आहे त्यातून जाण्याची तयारी नसताना, कदाचित त्याहूनही कठीण कामाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. काम करणे किंवा न करणे ही प्रत्येकाची निवड आहे.