यूपीएससी (UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार यासाठी तयारी करतात, पण त्यापैकी काही उमेदवारांनाच यश मिळते. या परीक्षेत काहीवेळा असे प्रश्न विचारले जातात जे वाचून डोकं गरगरायला लागतं. विविध विषयांवर आधारित प्रश्न असतात. त्यांची खूप खोलवर उलट सुलट विचार करून उत्तरं द्यावी लागतात. यातील एक विषय नीतिशास्त्राचाही असतो. ज्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विवेकबुद्धीने द्यायची असतात. असाच नैतिकतेवर आधारित प्रश्न एका आयएएस अधिकाऱ्याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत युजर्सना विचारला आहे, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आयएएस अधिकाऱ्याने विचारला असा प्रश्न
व्हायरल पोस्टमध्ये अधिकाऱ्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये चार वाहनं समोरासमोर उभी आहेत. ज्यामध्ये अग्निशमन दलाचे एक वाहन, रुग्णवाहिका, राष्ट्रपतींचे वाहन आणि पोलिसांच्या वाहनाचा समावेश आहे. आता या चारपैकी कोणत्या वाहनाला जाण्यासाठी आधी रस्ता दिला जाईल, असा सवाल अधिकाऱ्याने विचारला आहे. हा प्रश्न भारतीय प्रशासकीय सेवा’ (IAS) अधिकारी ‘जितिन यादव’ (@Jitin_IAS) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. आयएएसचे हे ट्विट खूप शेअर केले जात आहे, ज्यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अधिकाऱ्याने नैतिकतेच्या अभ्यासक्रमानुसार, सर्व चार वाहनांपैकी कोणत्या वाहनाला आधी जाण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, हे स्पष्टीकरणासह मांडण्यास सांगितले होते. ज्याचे उत्तर युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे. ज्यात अनेकांनी प्रथम क्रमांकावर रुग्णवाहिका, दुसऱ्या क्रमांकावर अग्निशमन दल, तिसऱ्या क्रमांकावर पोलिसांची गाडी आणि सर्वात शेवटी राष्ट्रपतींची गाडी असावी, असे उत्तर दिले आहे; तर काहींनी आपल्यापरीने याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तुम्ही कोणत्या वाहनाला आधी जाण्यासाठी जागा द्याल याचे उत्तर आम्हाला आमच्या सोशल मीडिया अकाउंटच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा.