देशात महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईचा फटका सर्वसामान्यांपासून इतरांनाही बसत आहे. घरातील जीवनावश्यक वस्तूंपासून ते गॅस सिलेंडर पर्यंतच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ही वाढत्या महागाईची समस्या आता लहान मुलांच्या देखील लक्षात येऊ लागली आहे. या वाढत्या महागाईची तक्रार एका चिमुकलीने पत्र लिहून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सध्या चिमुरडीने लिहिलेलं हे पत्र सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होतंय. उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात छिब्रामाऊ शहरात राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान मोदींना हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केल्याचही दिसून आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूपीच्या कन्नौज जिल्ह्यातील छिब्रामाऊ येथे राहणारी कृती दुबे सुप्रभाश अकादमीमध्ये इयत्ता पहिलीत शिकते. अलीकडे कॉपी-बुक, रबर आणि पेन्सिल या सर्व गोष्टी महाग झाल्यामुळे नाराज झालेल्या या चिमुरडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तिची ‘मन की बात’ आणि आईचा राग या दोन्ही गोष्टी शेअर केल्या आहेत. कृतीचे वडील विशाल दुबे हे वकील आहेत जे आपल्या मुलीने लिहिलेल्या चार ओळींमुळे संपूर्ण यूपीमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

(हे ही वाचा: कुत्र्याने केला जबरदस्त टॉवेल डान्स; Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल)

काय होते चिमुकलीने पत्र

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुलीने लिहिलंय की, ‘माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिल, रबरही महाग झाले आणि माझ्या मॅगीचीही किंमत वाढली आहे. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मला मारते. मी काय करू? इतर मुलं माझी पेन्सिल चोरतात.’ अशी तक्रार तिने केली आहे.

(हे ही वाचा: Viral Video: जेव्हा एक लहान मुलगी शिक्षकाविरोधात मोदींकडे करते तक्रार, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल)

एसडीएम यांनी दिले आश्वासन

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, छिब्रामाऊचे एसडीएम अशोक कुमार यांच्याकडून मुलीचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची पुष्टी झाली आहे. एसडीएम अशोक कुमार म्हणाले, ‘मी माझ्या वैयक्तिक क्षमतेनुसार या मुलीला मदत करण्यास तयार आहे. मला खूप आनंद होईल की जर कृतीने मला तिच्या अभ्यासासाठी किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या तर मी तिचा शब्द पाळत, या हुशार मुलीला मदत करण्यासाठी लगेच तिथे पोहोचेन.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i ask for a pencil mother beats me little girl complains to pm modi about expensive pencils maggi gps
First published on: 02-08-2022 at 10:12 IST