Dead Man’s Finger Viral: सोशल मीडियावर कधी कधी इतक्या विचित्र गोष्टी व्हायरल होतात की त्यांना बघून नेटकऱ्यांचा तर थरकापच उडतो. सध्या एक असं ठिकाण व्हायरल होत आहे ज्यात चक्क एका लाकडाच्या फटीतून मृत माणसाच्या बोटांसदृश्य गोष्ट बाहेर येत आहे. हा फोटो स्वतः भारतीय वन्याधिकारी (IFS)डॉ. सम्राट गौडा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला असून यात त्यांनीच नेटकऱ्यांना हे काय प्रकरण आहे हे ओळखण्यास सांगितले आहे. तुम्हालाही नेमका हाच प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर आपण जाणून घेऊया..

Viral फोटो नेमका आहे काय?

डॉ सम्राट गौड़ा यांनी शेअर फोटोमध्ये एक मोठे लाकूड पाहायला मिळत आहे ज्यामधून काळीकुट्ट, राखेसारखी बोटे बाहेर येताना दिसत आहेत. तुम्हाला पाहून असेल वाटेल कि कदाचित लाकडामध्ये एक भयानक राक्षस किंवा भूत आहे.

लाकडाच्या फटीतून बाहेर डोकावणारी ही गोष्ट प्रत्यक्ष कुणाची बोटं नाहीत तर हा एक नैसर्गिक फंगस आहे. हे फंगस मशरूमप्रमाणेच झाडाच्या खोडावर किंवा किंवा कोमेजलेल्या झाडामध्ये उगते. हे मातीच्या संपर्कात असते. याचे नाव Xylaria polymorpha असे असून याला सामान्य भाषेत मृत माणसाची बोटे असेही ओळखले जाते.

मेलेल्या माणसाची बोटे

हे ही वाचा<< Video: केळं समजून उचलला अजगर; या भल्यामोठ्या Python ची त्वचा बघून तुम्हीही गोंधळून जाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हि पोस्ट आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी शेअर केली आहे. दरम्यान या फोटोवर अनेकांनी मजेशीर कमेंट सुद्धा केल्या आहेत. काहींनी हा भुताच्या चित्रपटाचा खरा सीन आहे असेही म्हंटले आहे. काहींनी म्हंटले की, तुम्ही नव्यानव्या गोष्टी शोधून काढता, आता करोना जरा थांबला तर नवीन काहीतरी.. कृपा करा आणि मेलेली बोटे तशीच राहूद्या उकरून काढू नका असेही काही नेटकऱ्यांनी म्हंटले आहे.