Shocking video: ट्रेन प्रवासाबाबत नेहमीच प्रवाशांना वेगवेगळ्या सूचना, खबरदारी घेण्यास रेल्वेकडून सांगितलं जातं. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवरील अंतरावर लक्ष द्या, चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा उतरू नका. प्लॅटफॉर्मपासून लांब उभे राहा, रेल्वे रूळ ओलांडू नका, जिन्यांचा वापर करा अशा अनेक सूचना रेल्वेकडून देण्यात येतात. मात्र, या सूचना ऐकतील ते प्रवासी कसले. अशाच काही अतिशहाणपणा करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनच्या छतावर काही तरुण, व्यक्ती उभे आहेत, काही बसले आहेत. ही ट्रेन धावत आहे आणि धावत्या ट्रेनच्या टपावर जीवाची पर्वा न करता हे लोक स्टंटबाजी करत आहेत. मध्येच मोठमोठ्यानं ओरडत आहेत. त्यांच्यापैकीच एक जण हा व्हिडीओ शूट करत आहे. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. अशा जीवघेण्या स्टंटबाजीमुळे जीवही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

एखाद्याला ट्रेनच्या ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाला तर त्याचा जागीच कोळसा होऊ शकतो. मात्र हे कशाचीही पर्वा न करता बिंधास्त उभे आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> फोटोशूटच्या नादात नवरीची फजिती; लेहंग्यामध्ये अडकली अन् नको ते घडलं, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ भारतातला नाहीये, मात्र हे कृत्य खूप धोकादायक आहे. असे अनेक धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ ‘@khandakar17’ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या अशा मुलांमुळे इतरही मुलं बिघडतात, अशी प्रतिक्रिया एका युजरने केलीय.