मगर किती भयानक आहेत याचा अंदाज अनेकदा लोकांना नसतो. तुम्ही बऱ्याचदा मगरींचे व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. बर्‍याच व्हिडिओंमध्ये तुम्ही मगरीला इतर प्राण्यांची शिकार करतानाही पाहिलं असेल. असे व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो पण कंबोडियातील एक व्यक्ती या मगरींची शिकार झाला आहे.

४० मगरींनी एका ७२ वर्षांच्या वृद्धावर भयानक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मगरींनी हल्ला करून त्या व्यक्तीच्या शरीराचे अनेक तुकडे करून, त्याला ओरबाडून रंक्तरंजित केले. या व्यक्तीची चूक एवढीच होती की तो मगरींच्या घेऱ्यात पडल. मग त्याचं जे काही काही झालं हे ऐकून सर्वांनाच बसला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

४० मगरींच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

असे सांगितले जात आहे की, मृत व्यक्ती अंडी देणाऱ्या कुंडातून मगरीला काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने काठीचा वापर केला. पण तीच काठी मगरीने पकडली आणि तिच्या मदतीने त्या व्यक्तीला स्वतःकडे ओढले. ७२ वर्षांचा माणूस मगरीच्या घेऱ्यात पडला, त्यानंतर आणखी ४० मगरी त्याच्या दिशेने गेल्या आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला.

हेही वाचा – अमेरिकन यूट्यूबर म्हणे, ”चलो भाई, वापस बिहार चलते है!” कारण ऐकून चक्रावले लोक, म्हणाले,”…

मृताची ओळख पटणे कठीण
त्या हल्ल्यात त्या माणसाला मगरीने खाऊन टाकले होते आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना फक्त रक्त आढळले. मगरीचा शिकार झालेल्या ७२ वर्षीय मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाचेही इतके तुकडे झाले आहेत की ओळख पटणे कठीण आहे.

हेही वाचा – अमिता बच्चन ते शेहजादी खान, बॉलीवूड स्टार्सचे स्त्री-रूपातील AI ने तयार केलेले भन्नाट फोटो पाहिले का? तुम्हीही ओळखू शकणार नाही

हे यापूर्वी घडले आहे का?

कंबोडियात अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. वास्तविक कंबोडियातील सिएम रीप शहर मगरींचे अड्डा मानले जाते, येथे अनेक मगरी राहतात. अशीच एक घटना २०१९ मध्ये घडली होती जेव्हा एक दोन वर्षांची मुलगी मगरींच्या घेऱ्यात पडली होती. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला होता.

Story img Loader