Viral video: महाराष्ट्रात मराठी भाषेवरील वाद सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत. अशातच मुंबईतून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं मराठी हिंदी भाषेवरून वाद झाला. मॉलमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मराठीत बोलण्यासाठी सांगितलं असतेना आम्ही मराठीत का बोलू, नाही शिकायचं मराठी?” अशी आरेरावी केली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गेल्या काही महिन्यापूर्वी कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटी मराठी विरुद्ध अमराठी वादामध्ये तुंबळ हाणामारी प्रकरणं झालं होत. हे प्रकरणं विधानसभेत गाजलं होतं. मागील काही काळात अशी अनेक प्रकरणं मुंबई, ठाणे, कल्याण , डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले.आता मुंबईतील मॉलमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे.
गेल्या काही वर्षापासून परप्रांतिय आणि मराठी भाषा हे वाद मोठ्या प्रमाणात निर्दशनास येत आहे. अशातच मुंबईतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना मुंबईतील एका मॉलमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मॉलच्या पार्किंगमध्ये काही लोकांचा तिथल्या कर्मचाऱ्याशी गाडी पार्क करण्यैवरुन वाद सुरु झाला. यावेळी काही मराठी भाषिकांनी कर्मचाऱ्याला हिंदी नाही मराठीत बोलायला सांगितलं. यावर कर्मचारी उलट बोलून मी का बोलू मराठी, नाही शिकायचं मराठी मला..तू मला इकडे येऊन मराठी शिकवू नकोस या भाषेत आरेरावी करु लागला. ज्यामुळे वाद आणखी वाढला.याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ बघून तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची?
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ loksattalive या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “पहिले दोन कानाखाली वाजवा मग हिंदीत बोलायला सांगा”, दुसरा म्हणतो, “अशी आरेरावी करतात परत बोलतात मराठी माणसे मारतात”, तर आणखी एकानं, “हे जर माफी मागणारच असतात नंतर, मग उगीच आता मस्ती का दाखवतात??”