Pune accident video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येकानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. असाच विचित्र अपघात पुण्यातून समोर आला आहे. हा अपघात पाहिल्यानंतर आता लोकांनी घराबाहेर पडायचं की नाही असा प्रश्न पडतोय. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणेकर चांगलेच संतापले आहेत.

झालं असं की रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका तरुणीला एका रिक्षा चालकानं अक्षरश: उडवलं आहे.दिवसेंदिवस वाढत असलेल्या रिक्षांचा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे. त्यातच काही अनधिकृत रिक्षांची भर पडत आहे. रिक्षांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवित आहेत. रिक्षा रस्त्याच्या मध्येच अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या करतात. तर काहीवेळा प्रवासी घेण्याच्या नादात मध्येच रिक्षा थांबविल्या जातात यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, हॉर्नचा त्रास यामुळे वाढती रिक्षांची संख्या ही शहराची डोकेदुखी ठरू लागली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकाच्या बाजूला रस्ता ओलांडण्यासाठी उभी आहे. यावेळी पाठीमागून रिक्षा चालक येतो आणि रिक्षा टर्न घेताना तरुणी उभी आहे हे न बघता थेट रिक्षा पुढे घेऊन जातो. यावेळी तरुणीला रिक्षाची जोरदार धडक बसते आणि ती अक्षरश: जमीनीवर कोसळते. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसले. नशीब समोरुन एखादी गाडी आली नाही, नाहीतर या तरुणीचा मोठा अपघात झाला असता. हा व्हिडीओ पाहून आता तुमहीच सांगा नक्की चूक कुणाची?

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DGrvFxJotrH/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ punerispeaks नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.